Chanakya Quotes in Marathi – या लेखात आपण आचार्य चाणक्य यांचे नीती, कोट्स आणि अनमोल विचार वाचणार आहोत. आपल्याला हे Chanakya Niti Quotes नक्की आवडतील.
भारतातील एक महान विद्वान, तत्वज्ञानी म्हणून आपण सर्वजण आचार्य चाणक्य यांना ओळखतो. आचार्य चाणक्य हे खूप मोठे तत्वज्ञानी होते, तसेच ते एक अर्थशास्त्रज्ञ, राजकारणीदेखील होते. आचार्य चाणक्य यांचे विचार खूपच महान होते. त्यांचे सुविचार आपल्याला आजच्या काळात देखील खूपच उपयोगी पडणारे असे आहेत.
आचार्य चाणक्य यांना आपण विष्णुशास्त्री तसेच कौटिल्य या नावाने देखील ओळखतो. त्यांना विविध विषयाचे प्रगल्भ ज्ञान अवगत होते. त्यामध्ये राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, युद्धकला यांचा समावेश होतो.
Chanakya Quotes in Marathi
कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते,
जन्माने नाही.
शिक्षण एक चांगला मित्र आहे.
ज्ञानी व्यक्तीला सर्वत्र सन्मान, आदर मिळतो.
तारुण्य आणि सौंदर्य यापेक्षा शिक्षण श्रेष्ठ आहे.
माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे,
पण वाईट माणसाच्या संपूर्ण शरीरात विष आहे.
म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे.
कोणतेही काम सुरु करण्याच्या अगोदर स्वतः ला
नेहमी खालील 3 प्रश्न विचारा…
1) मी हे का करत आहे?
2) याचा काय परिणाम होऊ शकतो?
3) मी या कामामध्ये यशस्वी होईल का?
जर काम करण्याच्या अगोदर या प्रश्नांची उत्तरे मिळाली
तर तुम्ही योग्य मार्गावर आहात
आणि तुमच्या जिंकण्याची शक्यता देखील कैकपटींनी वाढते.
मुर्खांकडून प्रशंसा मिळवण्यापेक्षा
शहाण्याकडून ओरडा खाणे नेहमीच योग्य असते.
निर्दोष व्यक्तीला शिक्षा देऊन तुम्ही
अजून एक नवीन शत्रू बनवता.
जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही,
जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही,
जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाहीत
आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात.
आयुष्यातील तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा :-
1) आनंदात वचन देवु नका.
2) रागामध्ये उत्तर देवू नका.
3) दु: खामध्ये निर्णय घेवू नका.
आयुष्यात कोणतेही काम करायला लाजू नका
आपण आनंदात असणे, हेच आपल्या
शत्रूचे दुःखाचे मूळ कारण असते,
आणि
हीच त्याला सर्वात मोठी शिक्षादेखील असते.
मुर्ख लोकांशी वाद घालू नका
कारण असं केल्याने
आपण आपलाच वेळ वाया घालवतो.
बुद्धीमान व्यक्ती तीच आहे,
जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही,
घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही,
पैशांचा अपव्यय करत नाही,
आयुष्यात मिळालेला धोका, अपमान
आणि मनातील चिंता स्वतः पुरतीच मर्यादित ठेवते.
शब्द हे पण भोजन आहे,
प्रत्येक शब्दाला स्वतःची चव असते,
बोलण्यापूर्वी तुमचे शब्द चाखून पाहा,
जर तुम्हाला नाही आवडले तर इतरांना ते वाढू नका.
जर नशीबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे
असा विचार करू नका,
काय माहीत तुमच्या नशीबात हेच लिहिले असेल,
प्रयत्न केल्यावरच मिळेल.
क्रोध मूर्खपणापासून सुरु होऊन पश्चातापावर नष्ट होतो.
जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर नियंत्रण ठेवतो त्याला यश प्राप्त होत.
कधीच कोणासमोर स्वतःचे स्पष्टीकरण नका देऊ.
कारण ज्याला तुमच्यावर विश्वास आहे,
त्याला स्पष्टीकरणाची गरज नाही
आणि
ज्याला तुमच्यावर विश्वास नाही,
तो तुमच्या स्पष्टीकरणावर विश्वास ठेवणार नाही.
शहाणी व्यक्ती शहाणपणामुळे शांत बसते,
आणि मुर्खाला वाटते की ती
त्याला घाबरून शांत बसली आहे.
जसं भय जवळ येईल हल्ला करा
आणि त्याचा नाश करा.
एकदा आपण कोणतेही काम सुरु करता
तेव्हा त्याच्या अपयशाबद्दल घाबरू नका
किंवा त्याचा विचारही करू नका.
जे लोक प्रामाणिकपणे आपले कार्य करतात,
ते सर्वाधिक आनंदी असतात.
तुमचं आचरण चांगलं असेल तर
तुमचं दुःख कमी होऊ शकतं,
कारण मेंदूचा वापर करून
तुम्ही अज्ञानाला हरवू शकता
आणि माहिती गोळा करून भीतीला संपवू शकता.
जर तुम्ही दुःखी असाल तर,
तुम्ही भुतकाळात जगत आहात हे ओळखा.
जर तुम्हाला चिंता सतावत असेल,
तर तुम्ही भविष्यकाळात जगत आहात हे ओळखा.
जर तुम्ही शांत असाल तरच,
तुम्ही वर्तमानकाळात जगत आहात.
कर्ज, शत्रू आणि आजारपण यांना कधीच कमी समजू नका.
शक्य असल्यास त्यांना आपल्याजवळ
फिरकूही देऊ नका.
सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा
बदनामीची भीती जास्त मोठी असते.
महिला आणि पैसे दोघेही कधीही फसवणूक करू शकतात,
म्हणून या दोघांबद्दल नेहमीच हुशार रहा.
मत्सर अपयशाचे दुसरे नाव आहे.
अन्नाशिवाय मौल्यवान दुसरं कुठलंच धन नाही,
आणि भुकेपेक्षा मोठा दुसरा कोणताच शत्रू नाही.
जीवनात कोणाचे भलं कराल तर तुमचेही लाभ होईल,
कारण भल्याचा उलट शब्द लाभ आहे.
आणि कोणावर दया कराल तर तो,
तुम्हाला याद करेल,
कारण दयाचा उलट शब्द याद आहे.
ज्या व्यक्तीचे पोट भरलेले असते,
त्या व्यक्तीला चांगले अन्नही निरुपयोगी आहे.
एखाद्याकडे शक्ती नसूनही जो मनाने हरत नाही,
त्याला हरवण्याची ताकत कोणाकडेच नाही.
मृत्यू कधीही झोपत नाही,
तो नेहमी जागृत असतो,
म्हणून मृत्यूला कधीही विसरू नका.
व्यक्तीच्या मनात नेमके काय चालले आहे?
हे त्याच्या वर्तनावरून लक्षात येते.
एका आंधळ्या व्यक्तीला आरसा देणे व्यर्थ आहे,
त्याचप्रमाणे एका मुर्खाला पुस्तक देणे व्यर्थ आहे.
बुद्धिमान व्यक्तीचा कोणीही शत्रू नसतो.
इतरांसमोर वाका पण तितकंच जेवढं योग्य आहे,
नाहीतर विनाकारण समोरच्या व्यक्तीचा अहंकार वाढेल.
मुर्ख लोकांशी वाद घालणे
म्हणजे स्वतःचा वेळ खर्च करणे.
Also Read This
[500+] Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद
Chanakya Niti Quotes
एका राजाची ताकत त्याच्या शक्तीशाली हातात असते,
विद्वानाची ताकत त्याच्या ज्ञानात असते
आणि एका स्त्रीची ताकत
तिच्या सौंदर्य, तारूण्य आणि मधुर वाणीत असते.
प्रत्येक मैत्रीमागे स्वतःचा स्वार्थ लपलेला असतो.
स्वार्थाशिवाय मैत्री नसते.
हे जीवनातील एक कटू सत्य आहे.
जी व्यक्ती जिंकण्याची तसूभरही शक्यता नसताना
देखील हार मानत नाही,
त्या व्यक्तीला या संसारातील कोणतीही शक्ती
पराभूत करू शकत नाही.
भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका,
कारण चिंता आणि बैचेनी सोडून
वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे.
संकटाच्या वेळी नेहमी बुद्धीची परीक्षा होत असते,
आणि तिच आपल्या कामाला येते.
साप विषारी नसेल तरी जगण्यासाठी
त्याला फुस्स करावंच लागतं.
ज्याठिकाणी तुमचा सन्मान होत नाही,
त्याठिकाणी एक क्षणभर देखील थांबू नका.
तुमच्या शब्दांची ताकद कधीच
तुमच्या आईवडिलांवर वापरू नका,
विसरू नका… त्यांनी तुम्हाला बोलायला शिकवले आहे.
संसारात सर्वात मजबूत बंधन प्रेमाचे असते,
कारण भुंगा कठीण लाकडाचा भुगा करू शकतो.
पण तो कोमल कमळाच्या फुलातून,
जीव गेला तरी बाहेर पडू शकत नाही.
बरेच गुण असूनही,
फक्त एक दुर्गुण सर्व काही नष्ट करू शकतो.
दुसऱ्याजवळ असणाऱ्या धनाचा लोभ ठेवणे
हेच आपल्या अधोगतीचे कारण असते.
भाग्यपण त्यांनाच साथ देते,
ज्यांनी कठीण काळातही
स्वतःच्या ध्येयाची साथ सोडली नाही.
मजबूत मनाला हरवण्याची ताकत
कोणातच नाही.
तुम्हाला जे करायचे आहे,
ते जोरदारपणे करा,
आणि मनापासून करा.
हि गोष्ट सिंहापासून शिका.
आपल्या गुप्त गोष्टी कोणालाही सांगू नका,
ज्या गोष्टी तुम्ही गुप्त ठेवू शकत नाही,
त्या दुसरे लोक कसं काय गुप्त ठेवू शकतात.
स्वतःच्या गुप्त गोष्टी दुसऱ्याला सांगण्याची हि सवय तुमच्यासाठी
घातक सिद्ध ठरू शकते.
ज्याच्यावर तुमचे प्रेम असते
तुम्हाला त्याचीच भीती वाटते,
कारण प्रेम सर्व दुःखाचे कारण आहे.
फुलाचा सुगंध फक्त वातावरणात पसरतो,
पण चांगल्या व्यक्तीचे गुण सर्व दिशांना पसरतात.
आळशी लोकांना ना वर्तमान असतो,
ना भविष्य…
तुमचे जीवन इतके स्वस्त करू नका,
की कोणीही तुमच्या जीवनाचा खेळ करेल.
तुम्ही बोलत असताना जो इकडे-तिकडे पाहतो
त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका.
नशीबसुद्धा बहादूर लोकांचीच साथ देते.
जेव्हा भिती तुमच्यावर आक्रमण करेल,
तेव्हा तुम्हीही त्याच्यावर तुटून पडा
व त्याचा नाश करा.
आपल्यातील कमतरता कधीही इतरांना सांगू नका,
ते तुमच्यासाठी घातक सिध्द ठरू शकते.
जर कुबेरानेही आपल्या उत्पन्नापेक्षा
जास्त खर्च करण्यास सुरुवात केली,
तर तोही एक दिवस कंगाल बनेल.
सामर्थ्यवान शत्रू आणि
कमकुवत मित्र नेहमी हानीच करतात.
प्रेम काय आहे,
एक अशी नैतिक मादकता
ज्यात डुंबून तुम्हाला सर्व काही निरर्थक वाटू लागते.
कारण तुमच्यासाठी फक्त आता तीच व्यक्ती
महत्त्वाची असते,
जिच्यावर तुमचे प्रेम असते.
कोणाच्या वाईट काळात त्याच्यावर हसण्याची चूक करू नका,
कारण काळ नेहमी चेहरा लक्षात ठेवतो.
अवास्तव खर्च कुबेरालादेखील कंगाल करेल,
त्यामुळे खर्च मर्यादेत असू द्या.
बुद्धीमान व्यक्ती एक पाय उचलल्यावर
दुसरा स्थिर ठेवतो,
त्याचप्रमाणे पुढचे ठिकाण पाहिल्याशिवाय
पहिले स्थान सोडू नका.
कुटुंबावर खूप प्रेम करणाऱ्या व्यक्तीला नेहमीच भीती
आणि चिंतेचा सामना करावा लागतो,
कारण सर्व दुःखाचे मुळ प्रेम आहे.
कोणतीही व्यक्ती प्रमाणापेक्षा अधिक इमानदार
आणि सरळ स्वभावाची असता कामा नये,
कारण, जंगलातील सरळ वृक्ष
आणि समाजातील सरळ व्यक्ती
सर्वात अगोदर कापल्या जातात.
वडिलांच्या संपत्तीवर काय गर्व करायचा,
मजा तर तेव्हा येते,
जेव्हा संपत्ती तुमची असते,
पण गर्व वडिलांना होतो.
प्रेमसंबंध, तुमचे उत्पन्न
आणि तुमची पुढची चाल नेहमी गुप्त ठेवा.
भूतकाळात जे घडले,
त्यामुळे दुःखी होऊ नका.
चिंता आणि बेचैनी सोडून
वर्तमानकाळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी
केला पाहिजे.
नियती तुम्हाला प्रत्येक समस्येमधून
बाहेर पडण्याची संधी देत असते.
एखाद्या व्यक्तीमध्ये एकजरी चांगला गुण असेल
तरी त्याचे सर्व वाईट गुण झाकले जातात.
ज्ञान सर्वात चांगला मित्र आहे
कारण शिक्षणापुढे तारूण्य आणि
सौंदर्य दोन्ही कमजोर आहेत.
नियती म्हणजे केवळ योगायोग नाही,
ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून
बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते..
बुद्धीमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो.
सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य
सदैव दु:ख आणि कष्ट भोगत असतो.
असे लोक जीवनात काहीही करू शकत नाहीत…
जगातील सर्वाधिक बलाढ्य काय असेल,
तर ते म्हणजे,
पुरुषाची विवेकता आणि
महिलेचे सौंदर्य.
ज्यावेळी विनाश जवळ येतो,
त्यावेळी बुद्धी भ्रष्ट होते.
कमजोर व्यक्तीशी केलेले शत्रुत्व जास्त त्रासदायक असते,
कारण ती व्यक्ती अशा वेळी तुमच्यावर हल्ला करू शकते,
जिची तुम्ही कल्पनादेखील केलेली नसेल.
संसारात नेहमी एकाच स्त्रीवर प्रेम करा,
जिच्यासोबत तुम्हाला विवाह करायचा आहे.
Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह
आचार्य चाणक्य यांचे अनमोल विचार
सुखी जीवनाचे तीन मंत्र…
आनंदात कोणतेही वचन देऊ नका,
रागात कोणाला उत्तर देऊ नका
आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका.
काही गोष्टी या दुसऱ्याच्या चुकांमधून देखील शिका,
स्वतःवर प्रयोग करून जर तुम्ही
प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न केला
तर संपूर्ण जीवनदेखील तुम्हाला कमी पडेल.
समाधान आणि संयमाने मिळणारा
आनंद दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही.
मानवतेपेक्षा कोणताही धर्म श्रेष्ठ नाही.
जी व्यक्ती आपल्या निंदा शांतपणे ऐकून घेते,
ती दुनियेतील कोणतेही युद्ध जिंकू शकते.
मीठाप्रमाण कडवट ज्ञान देणारा तुमचा खरा मित्र आहे,
कारण इतिहास साक्षी आहे,
आजवर मीठात कधीच कीडे झालेले नाहीत.
ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा,
जास्त साधा-सरळ, आणि सहज असतो,
त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो…
धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात.
अशा लोकांना दुर्बल समजले जाते.
अनावश्यक स्वरुपात या लोकांना त्रास सहन करावा लागतो.
ज्या व्यक्तीला तुमचे मोल नाही,
त्या व्यक्तीसमोर तुमच्या प्रेमाची कबुली देऊ नका.
कारण अशी व्यक्ती तुमच्या प्रेमासोबत
तुमच्या भावनाही चिरडून टाकेल.
जीवनात पश्चाताप करणे सोडा
असे काहीतरी करा,
ज्यामुळे तुम्हाला सोडणारे पश्चाताप करतील.
जे इतरांचे कल्याण करतात,
त्यांनाच आध्यात्मिक शांती मिळू शकते.
देशाचे रक्षण करण्यासाठी तुम्ही
प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा.
तुमचे विचार व्यक्त करू नका,
बुद्धीमान व्यक्तीपासून ते लपवून ठेवा
आणि ते काम करण्याचा दृढ प्रयत्न करत राहा.
प्रत्येक व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू जर कोणता असेल
तर तो म्हणजे,
“त्याची भूक”.
सिंहाला जंगलाचा राजा घोषित करण्यासाठी कोणतीही
सभा आयोजित केली जात नाही,
तो स्वतःच्या पराक्रम आणि गुणाने राजा बनतो.
प्रेम आणि मैत्री बरोबरीच्या लोकांसोबत करा,
कारण राजाकडे नोकरी करणाऱ्याला सन्मान मिळतो,
व्यवसायिकासोबत व्यवहार योग्य ठरतो
आणि चांगल्या गुणांची स्त्री तिच्या घरात सुरक्षित राहते.
दुधात मिसळलेले पाणी पण दूध बनते,
गुणी व्यक्तीच्या सहवासात दुर्गुणी व्यक्तीपण गुणी होते.
जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, क्षुद्र मानत असाल,
याउलट स्वतःचा आदर करत असाल,
तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल.
मुर्खाचा आदर त्याच्या घरात होतो,
गावाचा प्रमुख त्याच्या गावात आदरणीय असतो
पण विद्वान मात्र जगात कुठेही वंदनीय असतो.
ज्याप्रमाणे नशा करणाऱ्या व्यक्तीला
बरोबर कि चूक याची जाणीव नसते,
स्वार्थी व्यक्तीला देखील बरोबर कि चूक
हे समजत नाही.
मुळात स्वार्थ हाच खूप मोठा नशा आहे.
वाईट व्यक्ती आणि काटे
यापासून वाचण्याचे फक्त दोनच उपाय आहे,
एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका
किंवा त्यांच्यापासून अंतर ठेवा.
नोकराची परिक्षा तेव्हा घ्या,
जेव्हा तो काम करत नसेल.
नातेवाईकाची परिक्षा तेव्हा घ्या,
जेव्हा तुमच्यासमोर एखादी समस्या असेल.
त्याचप्रमाणे मित्राची परिक्षा संकटात,
आणि पत्नीची परिक्षा आर्थिक संकटात घ्या.
अपमानित होऊन जगण्यापेक्षा मेलेलं बर…!
कारण मृत्य तर फक्त काही क्षण दुःख देतात,
मात्र अपमान प्रत्येक दिवशी दुःख देतो.
माणसाने भुतकाळाचा पश्चाताप करू नये,
भविष्याची चिंता करू नये,
कारण शहाणी माणसं फक्त वर्तमानात जगतात.
परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत;
मात्र जीभ एकच आहे.
याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे;
मात्र बोलावे मोजकेच.
कधीही वाईट लोकांच्या चांगल्या शब्दांवर विश्वास ठेवू नका.
कारण ते त्यांचा मूळ स्वभाव कधीही विसरत नाही.
वाघ हिंसा करायच सोडत नाही.
या जगात सर्वाधिक भरवशाच काय आहे,
तर ते म्हणजे स्वतःचे मन.
बुद्धीमान शांत राहतात,
आणि मुर्ख वाद घालतात.
फुलाचा सुगंध केवळ हवेच्या दिशेला पसरतो,
परंतु व्यक्तीचे सद्गुण सर्व दिशांना पसरतात.
समारोप
तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आचार्य चाणक्य यांचे कोट्स आपल्याला नक्कीच आवडतील. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर विचार आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जर आपल्याला हे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.
जर अजून काही कोट्स तुमच्याकडे असेल तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.
याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला भेट द्या.