[50+] वाढदिवस आभार संदेश, धन्यवाद संदेश | Birthday Thanks in Marathi

Thank you Message for Birthday Wishes in Marathi

[50+] वाढदिवस आभार संदेश, धन्यवाद संदेश | Birthday Thanks in Marathi

Birthday Thanks in Marathi – आपल्या वाढदिवशी आपले मित्र, प्रियजन आपणांस गोड शुभेच्छा पाठवतात, तेव्हा आपणही त्यांना आभार, धन्यवाद संदेश पाठवले पाहिजे…

आपल्या वाढदिवसाच्या दिवशी आपले मित्र आणि प्रियजन आपणास गोड शुभेच्छा आणि संदेश पाठवतात, तेव्हा ते आपल्याकरिता चांगल्या भावना व्यक्त करत असतात. आपणही त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतो. अशावेळी जर आपण त्यांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आभार मानले तर ते अधिकच चांगले होईल.

येथे आम्ही शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद मानण्यासाठी किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अत्यंत अर्थपूर्ण संदेश (Birthday Thanks in Marathi) व ते हि इमेजसह उपलब्ध करून दिले आहेत. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल.

Thank you Message in Marathi

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल
मी आपणा सर्वांचा मनापासून खूप खूप आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद!

Thank you Message for Birthday Wishes in Marathi

मानू कसे आभार तुमचे?
खरंच आज कळत नाही
तुमच्यासाठी तोलामोलाचे
शब्द काही मिळत नाहीत.
मनापासून धन्यवाद..!

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण
ज्या प्रेमरूपी सदिच्छा दिल्या,
शुभेच्छा दिल्या,
त्याबद्दल मी आपला खूप खूप ऋणी आहे.

Birthday Dhanyawad Message in Marathi

आपण सर्वांनी दिलेल्या वाढदिवसाच्या
शुभेच्छांबद्दल मी आपला
मनपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

शब्दातूनी कसे
आभार व्यक्त करावे तुमचे,
तुमच्या विषयीच्या आदराने
मन भरून आले आमचे.
धन्यवाद..!

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील…
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून
जो शुभेच्छारुपी वर्षाव केला.
त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो…
मनापासून धन्यवाद!

Birthday Thanks in Marathi

माझा वाढदिवस खरं तर,
वर्षातून एक दिवस साजरा करता येईल.
पण, आपण सर्वांनी दिलेल्या
अनमोल व अगणित शुभेच्छा.
आयुष्याच्या वेलीवर आणि मनाच्या पानावर
कायमस्वरूपी कोरल्या जातील.
धन्यवाद..!

काल माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रातील राजकीय,
शैक्षणिक, सामाजिक, वडीलधारी आणि मित्र परिवार
यांनी दिलेल्या आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो.
शुभेच्छांचा वर्षाव एवढा होता की कोणाचे वैयक्तिक आभार
पण करता आले नाही. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.
कोणी विचारलं काय कमावलं तर मी अभिमानाने सांगू शकेल
की तुमच्यासारखी जिवाभावाची माणसं कमावली.
पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार…!

आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून
मला फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात.

आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसादिवशी प्रत्यक्ष व
अप्रत्यक्षरित्या दिलेल्या शुभेच्यांबद्दल खूप खूप आभार. असेच प्रेम यापुढे
राहील ही अपेक्षा. धन्यवाद…!

धन्यवाद!
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या
शुभेच्छांबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे…
असेच प्रेम माझ्यावर राहू देत,
हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
धन्यवाद!

Thanks Message for Birthday Wishes

माझ्या वाढदिवसाला तुम्ही दिलेल्या
शुभेच्छांमुळे परिपूर्ण शोभा आली,
आपले खूप खूप आभार…

माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहकारी मित्र,
आपण सर्वांनी माझ्या वाढदिवसानिमित्त
प्रेमरूपी शुभेच्छा दिल्याबद्दल मी आपणा सर्वांचा
अगदी मनापासून आभारी आहे.
आपल्यासारखे मित्र लाभले हे माझे भाग्य समजतो.
पुन्हा एकदा धन्यवाद…!

माझ्या वाढदिवशी तुम्ही पाठवलेल्या
गोड शुभेच्छां बद्दल,
मनापासून धन्यवाद.
तुम्ही सर्वांनी दिलेल्या भरभरून
प्रेमामुळे मी भारावून गेलो आहे.
धन्यवाद

Birthday Return Wishes in Marathi

आज माझ्या वाढदिवसानिमित्त
आपण सर्वांनी वेळात वेळ काढून मला
फोन करून, भेटून व मेसेज करून
ज्या शुभेच्छा दिल्या त्यासाठी आपले खूप खूप आभार.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहु द्यात.

तुम्ही दिलेल्या शुभेच्छा माझ्यासाठी
लाख मोलाच्या आहेत.
असेच तुमचे प्रेम माझ्यावर सदैव राहु द्या.
ही ईश्वर चरणी प्रार्थना
मनःपूर्वक धन्यवाद…!

फक्त धन्यवाद म्हणून मी काढणार नाही पळ
तुमच्या प्रेमळ शुभेच्छाच देतात जगण्याचे बळ
आभार !

तुमच्या मनस्वी प्रेमाने व निर्मळ
मैत्रीने मी तर खरोखर भारावून गेलो आहे.
तुम्ही मला सोशल मीडिया द्वारे तसेच
कॉलद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल
मी सर्वांचा मनापासून खूप ऋणी आहे.
काहींना चुकून धन्यवाद करण्याचे
राहून गेले असेल तर त्यांनी कृपया राग मानू नये.

Also Read This
[200+] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Birthday Thanks in Marathi

ज्या मित्रांनी शुभेच्छा दिल्या,
त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.
तुम्हा सर्वांचे हे प्रेमाचे व मैत्रीचे ऋण मी कधीच
फेडू शकणार नाही
आपले प्रेम सदैव असेच राहो. धन्यवाद

आपण दिलेल्या शुभेच्छांचा जणू माझ्यावर वर्षावच झाला.
आपल्या याच शुभेच्छांमुळे माझा आनंद द्विगुणित झाला.
खरेच आपण वेळात वेळ काढून मला
शुभेच्छा दिल्याबद्दल मनापासून आभार.
असेच चांगल्या-वाईट प्रसंगात माझ्या
पाठीशी उभे रहा.
धन्यवाद!

Thanks in Marathi for Birthday Wishes

आपण सर्वांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छाआणि आशीर्वाद मला मिळाले.
मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे…
आपण आपले शुभाशीर्वाद असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी अपेक्षा बाळगतो…
धन्यवाद!

काल माझ्या वाढदिवसानिमित्त…
विविध क्षेत्रातील राजकीय, शैक्षणिक,
सामाजिक, वडीलधारी…
आणि मित्र परिवार यांनी दिलेल्या…
आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा
मी मनस्वी स्वीकार करतो.
धन्यवाद!

Thank You for Birthday Wishes in Marathi

सदैव राहू द्या आशीर्वादाची
थाप आमच्या पाठी,
काळजातले दोन शब्द
तुमच्या आभारासाठी !

तुमचे प्रेम, तुमच्या शुभेच्छा मला
नेहमीच प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
मला शुभेच्छा दिल्या त्या बद्दल मी
आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा..!
मनःपूर्वक धन्यवाद…!

माझ्या वाढदिवसा निमित्त
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल मी आपला आभारी आहे .
पुढील काळात असेच प्रेम आपल्याकडून
मिळो हिच ईश्वर चरणी प्रार्थना…!
पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद!

वाढदिवस आभार संदेश

मानतो आभार मनापासून
साथ शुभेच्छांची अशीच राहू द्या !
या ऋणानुबंधांनी जुळलेल्या मनात
आपुलकीचे भाव कायम असू द्या!
धन्यवाद ..!

ज्यांनी वेळात वेळ काढून मला माझ्या वाढदिवशी शुभेच्छा दिल्या
आहेत त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
असेच आशीर्वाद माझ्यावर राहू देत
हीच प्रार्थना.
धन्यवाद…!

आपल्यासारख्या मित्रांकडून मिळालेल्या
शुभेच्छांमुळे माझा वाढदिवस
खूपच आनंददायक बनला आहे.
असेच प्रेम यापुढे राहील ही अपेक्षा.
धन्यवाद!

Thank you Message Marathi

माझ्या वाढदिवशी मला मिळालेली सर्वात
सुंदर भेट म्हणजे तुमच्या शुभेच्छा.
असेच प्रेम व आशीर्वाद माझ्यावर राहू देत,
धन्यवाद…!

माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दिलेल्या प्रेमरूपी शुभेच्छांचा
मी अखंड ऋणी आहे.
आपल्या सर्वांच्या सदिच्छांचा आदर ठेवून सर्वांचे
मनःपूर्वक आभार…!

आपण मला वाढदिवसानिमित्त विविध
माध्यमातून फोन द्वारे, सोशल मीडिया द्वारे,
वेळात वेळ काढून ज्या शुभेच्छा दिल्या
त्या बद्दल मी आपला मनापासून आभार मानतो
व असेच प्रेम, आपुलकी, आशीर्वाद
आपल्याकडून मिळत राहो हीच अपेक्षा….
धन्यवाद!

धन्यवाद संदेश मराठी

तुमच्या शुभेच्छा माझ्यासाठी खूप काही आहेत,
आपण वेळात वेळ काढून आपल्या शुभेच्छांचा वर्षाव केला,
याबद्दल मी आपला आभारी आहे.
धन्यवाद…!

Also Read This
[500+] Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद

वाढदिवसाचे आभार स्टेटस

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी विविध माध्यमातून
प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद!

माझ्या वाढदिवशी आपण सर्वांनी विविध
माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
सदभावना व्यक्त केली त्या सर्व शुभेच्छांचा
मनापासून स्वीकार करतो…!
धन्यवाद!

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण मला प्रत्यक्ष भेटून,
भ्रमणध्वनीद्वारे, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया,
इत्यादी माध्यमातून दिलेल्या शुभेच्छा बद्दल
मी आपला अत्यंत आभारी आहे.
येणाऱ्या काळामध्ये आपल्या शुभेच्छा
आणि शुभ आशिर्वाद माझ्यासाठी
नक्कीच प्रेरणादायी असतील..
धन्यवाद..!
सर्वांचे मनापासून आभार..!

अखंड राहील शिरावर
आपल्या उपकारांचा भार,
शब्दातून व्यक्त करतो
तुमचे मनःपूर्वक आभार !

तुमचे प्रेम आणि तुमच्या शुभेच्छा मला नेहमीच…
प्रेरणा आणि बळ देतात.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी मला शुभेच्छा दिल्या,
त्या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे.
अशीच साथ आणि आपला आशीर्वाद
माझ्यासोबत सदैव राहो ही सदिच्छा…
मनःपूर्वक धन्यवाद…

आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा
मी मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम
या पुढे ही असेच राहुदे,
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला या
पुढील आयुष्या साठी प्रेरणादाई राहतील.
धन्यवाद!

तुम्ही दिलेल्या शुभेच्छामुळे..
माझे हृदय आनंदाने भरून गेले आहे.
वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

मला माझ्या वाढदिवसादिवशी भरभरून शुभेच्छा देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे तसेच वडीलधाऱ्या व्यक्तींचे
मनः पूर्वक आभार.
धन्यवाद…!

तुम्ही दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कोणत्याही
भेटवस्तू पेक्षा सुंदर आहे.
कोणत्याही केक पेक्षा गोड आणि
कोणत्याही मेणबत्तीच्या प्रकाशा पेक्षा जास्त
चमकदार आहेत. भरभरून प्रेम देणाऱ्या
माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींचे
तसेच वडीलधाऱ्या चे
मनःपूर्वक आभार

दर वर्षी वाढदिवस येतो आणि वय वाढवून जातो.
वाढणाऱ्या वयासोबत जबाबदारी देऊन जातो.
आपण वेळात वेळ काढून दिलेल्या शुभेच्छा
ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी पूरक ठरतात
आणि ही आपली माणसं आपल्यासोबत
आहेत ह्याची जाणीव करून देतात!
आपण दिलेल्या शुभेच्छा बद्दल पुनः एकदा मनापासून आभार !

Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

वाढदिवस आभार मेसेज मराठी

माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी
विविध माध्यमातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या
शुभेच्छारुपी स्नेह व्यक्त केल्याबद्दल
सर्वांना मनापासून धन्यवाद…

आपले प्रेम, स्नेह आणि विश्वास यांचा अमूल्य ठेवा
मनाच्या गाभाऱ्यात कायम जतन राहील.
आपण सर्वांनी माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष,
अप्रत्यक्ष रूपाने विविध माध्यमातून जो शुभेच्छारुपी
वर्षाव केला, त्यासाठी मी मनापासून धन्यवाद देतो.

तुमच्या शिवाय माझा वाढदिवसच
काय, माझं आयुष्यही अपूर्ण आहे.
मी असेपर्यंत प्रत्येक वाढदिवस हा
तुझ्याबरोबरच साजरा करायचा आहे.
तुझ्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद…

मोल आजच्या शुभ दिनाचे,
कोणत्या शब्दात मांडावे,
हर्षाने नटलेल्या प्रत्येक
क्षणांना काळजात साठवून ठेवावे.
धन्यवाद !

मनःपूर्वक आभार आपण सर्वांनी दिलेल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा बद्दल मी
आपला मनःपूर्वक आभारी आहे…
स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा.
हीच ईश्वरचणी प्रार्थना धन्यवाद.!
मनःपूर्वक आभार !

वाढदिवस हे निव्वळ निमित्त
खरेतर या निमित्ताने अमूल्य क्षण आठवतात,
जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
आणि सर्वात महत्वाचे जगण्याच्या लढाईला बळ मिळते.
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमळ शुभेच्छा
मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढवणाऱ्या आणि
प्रेरणादायी ठरणार आहेत.

सर्वांचे मनापासून आभार.
शब्दात आभार व्यक्त होणे
शक्य नाही, तरीही आपण दिलेल्या प्रेमळ
शुभेच्छाबद्दल आपला मनापासून आभारी आहे.
असेच प्रेम व तुमची साथ माझ्यासोबत
कायमस्वरूपी राहू द्या.
मनापासून धन्यवाद.

एखाद्याच्या आयुष्यात चांगली माणसं असणं
यापेक्षा अधिक मोठा खजिना तो काय असणार.
सहकाऱ्याच्या रूपाने हा खजिना मला मिळाला आहे.
माझा वाढदिवस खास केल्याबद्दल आभार…

आपल्या शुभेच्छांचा प्रेमाचा मी
मनापासून स्वीकार करतो.
आपला स्नेह, आदर आणि आपले
ऋणानुबंध जपण्याचा मी
मनापासून प्रयत्न करीन.
आपण आपले प्रेम
या पुढे ही असेच राहु दे.
हीच माझी ईश्वरा कडे मागणी राहील.
निश्चितच आपल्या शुभेच्छा मला
या पुढील आयुष्यासाठी प्रेरणादायी राहतील.
धन्यवाद…

समारोप

आपले वय कितीही वाढले तरी मित्र आणि कुटुंबासमवेत वाढदिवस साजरा करण्यासारखे सुख कशातच नाही. आपली जवळची मित्र मंडळी, नातेवाईक आपल्याला आवर्जून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पाठवतात. आपणही त्यांच्याप्रती स्नेह व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे आभार मानणे योग्य ठरते. आम्ही याचसाठी वरील सर्व माहिती आपल्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.

मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि आम्ही जी माहिती आपल्याला दिली आहे, ती माहिती नक्कीच आपल्या उपयोगी येईल. आपण हि माहिती आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल.

याच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

FAQ’s

वाढदिवसाचे आभार कसे व्यक्त करावे?

तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. आपण दिलेल्या शुभेच्छांमुळे माझा दिवस आनंदात गेला. तुमच्या या सदिच्छा मी कधीही विसरू शकत नाही. माझा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.

वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी टीमचे आभार कसे मानायचे?

माझ्या वाढदिवसासाठी माझ्या सहकारी टीमचे मला इतके प्रेम आणि शुभेच्छा दिल्याबद्दल धन्यवाद.

वाढदिवसाच्या शुभेच्छांनंतर धन्यवाद कसे म्हणायचे?

वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल मी सर्वांचे आभारमानतो. माझ्या वाढदिवसानिमित्त संदेश आणि पोस्ट्सबद्दल धन्यवाद! ते सर्व खूप कौतुकास्पद आहेत आणि तुम्ही पूर्णपणे माझा दिवस खास बनवला आहे.

मी धन्यवाद नोट कशी लिहू?

धन्यवाद नोट लिहिताना त्यातील दीर्घता टाळावी. व्यक्तींना त्यांच्या भेटवस्तू, शुभेच्छा इ. साठी आभार मानून आपल्या इतर बाबीस सुरुवात करावी.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply