[200+] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Birthday Wishes in Marathi

[200+] Birthday Wishes in Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन

Birthday Wishes in Marathi – तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही येथे जवळपास 200 पेक्षाही अधिक Birthday Wishes उपलब्ध करून दिले आहेत.

वाढदिवस म्हटलं कि, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद पहावयास मिळतो. कारण प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्या जीवनातील प्रत्येक वर्षी येणारा महत्वाचा दिवस असतो. यादिवशी प्रत्येकजण खूपच खुश असतो. अशावेळी ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्या व्यक्तीची एकच अपेक्षा असते, ती म्हणजे आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून भरभरून मिळणाऱ्या शुभेच्छा. प्रत्येक व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या तर ते चांगलेच वाटते.

एखाद्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना इतर व्यक्तींना त्यांच्यासाठी एखादा खास वाढदिवस संदेश शोधणे खूपच अवघड होऊन बसते. विशेषतः ज्या व्यक्तीबरोबर आपला कायमचा सहवास असतो किंवा ज्या व्यक्ती आपल्याला खूपच जवळच्या असतात, अशा व्यक्तींचा जर वाढदिवस असेल, तर त्यांना कोणता वाढदिवस संदेश पाठवू? त्यांना तो आवडेल का? अशा प्रकारचे हजारो प्रश्न आपल्या मनात नेहमीच उमटत असतात.

जर आपल्यालाही असाच प्रश्न पडला असेल तर आम्ही आपल्यासाठी याठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश उपलब्ध करून दिलेले आहे. आपण आपल्याला हव्या त्या पद्धतीने त्यातून निवडून किंवा इमेज डाऊनलोड करून आपल्या जवळच्या व्यक्तीला पाठवू शकता.

Birthday Wishes in Marathi

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो,
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो,
आणि
परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

Birthday Wishes in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी.
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हाव हीच शुभेच्छा…!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा….!

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Birthday Wishes in Marathi

वर्षाचे 365 दिवस ..
महिन्याचे 30 दिवस ..
आठवड्याचे 7 दिवस..
आणि माझा आवडता दिवस,
तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा…!

हॅपी बर्थडे
दोस्ती कभी बड़ी नहीं होती,
निभाने वाले हमेशा बड़े होते हैं…
पाटील आपणास वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

!! जय महाराष्ट्र !! आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवस येतो
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
एक नवीन स्वप्न घेऊन येतो
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

Happy Birthday Shubhechha

तुमच्या वाढ दिवसाचे हे,
सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो,
आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.
हीच मनस्वी शुभकामना.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी
नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

नाते आपल्या प्रेमाचे
दिवसेंदिवस असेच फुलावे
वाढदिवशी तुझ्या तू
माझ्या शुभेच्छांच्या
पावसात भिजावे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आज आपला वाढदिवस वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
ह्याच वाढ दिवसाच्या अगणित शुभेच्छा !!

या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी.
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
अधिकाधिक सुंदर व्हावं हीच शुभेच्छा.

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात.
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आईसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा..
शिवछत्रपतींच्या आशिर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

Birthday Wishes Marathi

मनाला अवीट आनंद देणारा,
तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की,
वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,
पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही
विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण..
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक सण होऊ दे हीच सदिच्छा..!
वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा…!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी
किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी
वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.

Birthday Wishes Marathi Images

तुझ्यासाठी वेगळं असं काय लिहू आई,
तू माझं जग आहेस आणि
माझ्या जगातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीला
वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
Happy Birthday Aai

आई, आज तुझा वाढदिवस,
आमच्या सर्वांसाठी खास दिवस,
तुला जगातली सर्व सुख मिळो आणि
यापुढे कधीही तुला दगदग करायला न लागो,
याच इच्छेसह तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Vadhdivsachya Hardik Shubhechha

आई म्हणजे आनंदाचा झरा,
आई तू म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेस,
तुझ्या या खास दिवशी तुला माझ्या मनातील
प्रेम कदाचित मला दाखवता येणार नाही
पण वागण्यातून तुझ्याविषयीचे प्रेम नक्की व्यक्त होईल,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला,
तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने,
तुमची माझी भेट घडवली.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

आपणास शिवनेरीची श्रीमंती,
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
सिंहगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी प्रार्थना!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो…!
जय शिवराय…!

Happy Birthday in Marathi

नशिबवान असतात ते लोक ज्यांच्या डोक्यावर
वडिलांचा हात असतो आणि
माझ्याइतकं नशिबवान कोणीच नाही
कारण तुम्ही माझे बाबा आहात,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

आयुष्यात तुम्हाला सुख,
समाधान, समृद्धी मिळो आणि
दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
बाबा, वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

नातं आपल्या मैत्रीचे
दिवसेंदिवस असंच फ़ुलत राहावे,
तुझ्या या वाढदिवसादिवशी,
तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे…!!!
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Marathi Birthday Wishes

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू,
तुला मिळवून मी झालो धन्य,
प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी,
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी…!!!

Also Read This
[500+] Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद

Happy Birthday Wishes in Marathi

Smile हिची खास,
तर कधी Attitude पण झक्कास,
कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास,
कधी मधी आवडीने सवडीने बोलनारी,
बिनधास्त बोलता बोलता टोमणे मारणारी,
Whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या
गालात हसणारी,
आणि
विशेष म्हणजे भांडण करण्यात कायम अग्रेसर राहणारी,
थोडीशी Angry थोडीशी प्रेमळ,
चेहेऱ्यावर कायम smile आसणारी,
असो………
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा…
सुंदर गोड फुला प्रमाणे फुलतं रहा…
आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे क्षण वेचत रहा…
प्रत्येक संकटांना, दुःखाला समर्थपणे हरवत रहा…
नेहमी हसत हसत आनंदी रहा….
HAPPY BIRTHDAY SMILLY

आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो,
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना,
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर
करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात.
जसा तुझा वाढदिवस.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

बोट धरून चालायला शिकवले आम्हाला
आणि
आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हाला
अश्रू पुसून आपले हसवले आम्हाला
परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अशा माझ्या बाबांना,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा बाबा!

Happy Birthday

माझ्या स्वप्नांसाठी तुम्ही तुमचे आयुष्य पणाला लावले,
अजून काय हवे,
यापुढे तुम्हाला सर्व सुख मिळो हीच सदिच्छा,
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

तुमच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
मला जीवनाचे रहस्य सांगतात,
तुम्ही मला कायम विठ्ठलासारखे भासता,
प्रिय बाबा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

काही माणसं स्वभावाने कशी का असेनात?
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजे तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

खिसा रिकामा असूनही कधी दिला नाही नकार,
तुमच्याइतका श्रीमंत व्यक्ती आजपर्यंत कधीच आला नाही आयुष्यात,
अशा माझ्या बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Vadhdivsachya Shubhechha

बाबा तुम्ही जगासाठी असाल एक व्यक्ती,
पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जगच तुम्ही आहात,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

खरंच मी लकी आहे की,
मला तुझ्यासारखा भाऊ आहे.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भावा.

काहीही न करता मिळतं सारं,
तरीही याचं रडगाणं सुरूच खरं,
लहान असल्याचा नेहमीच गाजवतो तोरा,
काही झालं की चढतो याचा तोरा.
अशा माझ्या या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कसाही असलास तरी आता काय माझा भाऊ आहेस,
किमान आजच्या दिवशी तरी शुभेच्छा द्यायलाच हव्यात ना!
चल चल जाऊ दे,
आजच्या खास दिवशी तुला मनापासून शुभेच्छा!

हसत राहा तू सदैव तू,
चमकत राहा सदैव तू,
जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तू,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना…!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!!!

Vadhdivas Shubhechha

भाऊचा Birthday म्हणल्यावर,
चर्चा तर होणारच…!
भाऊ नी राडा येवढा केलाय की भाऊच्या
Birthday ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल…!
अशा Looking वाल्या माझ्या भावा सारख्या मित्राला
जन्मदिवसाच्या कचकटून मनापासून लाख लाख शुभेच्छा…
HAPPY BIRTHDAY BHAVA

तुला तुझ्या आयुष्यात सर्व सुख मिळो
आणि तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत,
याच शुभेच्छा माझ्या भावा!

माझ्यासाठी तू काय आहेस
हे तुला वेगळं सांगायची गरज नाही,
पण आजचा दिवस खास आहे आणि
या खास दिवशी तू माझं सर्वस्व आहेस
हेच मला तुला सांगायचं आहे,
तुला कायम मी साथ देईन,
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट.
पण थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट.
Happy Birthday

तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे,
तुझ्या पंखानी आकाशात उंच भरारी घेऊ दे.
तुला उदंड आयुष्य लाभू दे.
हिच परमेश्वर चरणी प्रार्थना,
तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

जगातले सर्व सुख तुला मिळावे,
आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे,
हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना,
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

माझे जग तू आहेस,
माझे सुख तू आहेस,
माझ्या जीवनाच्या वाटेवरील तू अखंड प्रकाश आहे,
माझ्या जीवनाचा तूच खरा अर्थ आहेस.
तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

Happy Birthday Wishes Marathi

तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा,
तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा…
तुझं आमच्या आयुष्यात असणं म्हणजे उन्हामधल्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
बोलणार नाही कारण,
मित्र नाही तर भाऊ आहे आपला,
रक्ताचा नाही पण जिव आहे.. आपला,
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे,
साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या
काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

दुःख काय आहे ते विसरून जाशील
एवढा आनंद देव तुला देवो…
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे dashing boy
या नावाने प्रसिध्द असलेले
आपल्या Royal भावाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!

Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi

सूर्यासारखा तेजस्वी हो,
चंद्रासारखा शीतल हो,
फुलासारखा मोहक हो
आणि कुबेरासारखा ऐश्वर्यवान हो…
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

आमचे लाडके भाऊ …
दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , …….
गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले,
अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले,
मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे,
मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले,
सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी,
मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे,
असे आमचे खास लाडके मित्र ……………………
यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!

Also Read This
[200+] Marathi Shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह | Love Shayari in Marathi

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

हास्य तुझ्या चेहऱ्यावरून कुठेच जाऊ नये,
अश्रू तुझ्या डोळ्यात कधीच येऊ नये,
पूर्ण होवो तुझ्या सर्व इच्छा हिच परमेश्वर चरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू सांगितलेल्या गोष्टींमधून मला प्रेम
आणि दयेची शिकवण मिळाली,
आज मी जे काही आहे
ते तुझ्याच शिकवणीचं प्रतिक आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझ्या केवळ असण्यानेच आमचं आयुष्य आनंदी आहे,
तू नेहमी निरोगी आणि सुखी राहा हिच देवाजवळ प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आयुष्याच्या या पायरीवर..
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे…!

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो !
तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा,
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत.
आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा.!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आनंदी क्षणांनी भरावे तुझे आयुष्य असावे,
हीच माझी इच्छा
बायको तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

आयुष्याच्या अवघड वाटेवर तू दिलीस मला साथ,
कधीही सोडला नाहीस माझा हात,
कधी चिडलो, भांडलो तरी प्रेमाने तू देतेस मला साथ,
बायको तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्याशिवाय जात नाही दिवस हा माझा,
सहचारिणी आहेस तू माझ्या या जीवनाची,
पूर्ण होवोत तुझ्या सगळ्या इच्छा
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

छोट्या छोट्या गोष्टींसाठी जे कपल भांडतात,
तेच खरे एकमेकांवर प्रेम करतात,
बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

प्रेमातील निखळ मैत्री,
आणि मैत्रीतील नि:स्वार्थ प्रेम निभावलेस तू,
मायेने आणि प्रेमाने माझ्या संसाराला दिले सुंदर रुप तू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

Vadhdivsachya Hardik Hardik Shubhechha

तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहवो, ,
तुझ्या डोळ्यात अश्रूंचा एकही थेंब न येवो,
आनंदाचे हसू तुझे असेच खुलत राहो,
वाढदिवसाच्या शुभेच्छा

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
काही चांगले, काही वाईट,
काही कधीच लक्षात न राहणारे….
आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
आणि मनात घर करून राहणारी माणसं,
त्यातलेच तुम्ही एक आहात…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!
हसत राहा तू…
सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू,
हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात
तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

जे जे हवे तुला ते ते मिळू दे,
भाग्यवान या शब्दाचा अर्थ
तुझ्याकडे पाहुन कळु दे,
शिखरे यशाची सर तु करावी,
पाहता वळूनि मागे शुभेच्छा माझी स्मरावी,
तुझ्या आनंदाचा वेल गगनाला भिडू दे,
आयुष्यात तुझ्या सर्व काही मनासारखे घडू दे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
वाढदिवसा निमित्त शुभेच्छा…!

जन्मो जन्मी राहावे तुझे आणि माझे नाते,
दरवर्षी यावे क्षण हे अधिकाधिक,
पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा अनेक

चांगल्या आणि वाईट वेळेत
तुम्ही दिलीत मला साथ,
वाढदिवसाचा आजचा दिवस तुमच्यासाठी आहे खास,
पती तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

चांगले मित्र येतील आणि जातील,
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि
जिवाभावाचे सोबती असाल.
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,
मी खूप नशीबवान आहे कारण,
तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत…
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

हॅपी बर्थडे
तुझा वाढदिवस म्हणजे
आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा…
तुझा वाढदिवस म्हणजे
सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

माझ्या आयुष्यातील माझी
सगळ्यात लाडकी व्यक्ती
म्हणजे तुम्ही,
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!

तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं,
देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा

काळजाचा ठोका म्हणा किंवा शरीरातील प्राण
असा मित्र आहे भाऊ
आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहिनूर हिरा
ह्या काळजाच्या तुकड्याला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

लखलखते तारे, सळसळते वारे,
फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले…!
तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

नवा गंध ,नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!.

आयुष्यात एखादी व्यक्ती इतकी जवळ येते
कि
त्याच्या शिवाय एक क्षणही राहू शकत नाही,
आय लव्ह यु.
हॅप्पी बर्थडे…!!!

माझ्या मनाला अवीट आनंद देणारा
तुझ्या वाढदिवसाचा दिवस आला की वाटतं
तुझ्यासारखा जिवाभावाचा मित्र मिळाल्याने
माझे आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दोस्ता!

आयुष्याच्या या पायरीवर
तुझ्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे,
तुला उदंड आयुष्य लाभू दे हीच सदिच्छा!
प्रिय मित्रास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!

नवे क्षितिज नवी पहाट,
फुलावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट..
स्मित हास्य तुझ्या चेहेऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी परमेश्वराचा आशीर्वाद सदैव राहो.
लाडक्या मैत्रीणीस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Vadhdivsachya Hardik Shubhechha

शिखरे उत्कर्षाची सर तू करीत रहावी !
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुझ्या सर्व इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे !
तुझ्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !
तुला दीर्घायुष्य लाभो ही इच्छा !
मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वतः पण नाचेन तुलाही नाचवेन
मोठ्या उत्साहाने तुझा वाढदिवस साजरा करेन
गिफ्टमध्ये तुला देईन माझी जान,
तुझ्यावर होईन मी फिदा.
हॅपीवाला बर्थडे

तुझ्या ईच्छा आकांक्षा
उंच भरारी घेऊ दे
मनात आमच्या एकच ईच्छा
तुला उदंड आयुष्य लाभुदे.!
लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा…!!!

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस…
बायको तुला,
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा…!

बागेमध्ये फुलांच्या जसा मोहरतो पारिजात,
मैत्रीच्या दुनियेतील तसेच तुम्ही आहात.
तुमच्या या जन्मदिनी एवढ्याच आमच्या सदिच्छा
आभाळाएवढ्या माणसाला आभाळभर शुभेच्छा!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा वाढदिवस आहे खास
कारण तु आहेस सगळ्यांसाठी खास
आज पूर्ण होवो तुझी इच्छा
खास Happy Birthday

साथ माझी तुला प्रिये,
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा,
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले…
सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसतमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त …………..
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा‪…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

जन्मो जन्मीआपले नाते असेच अतूट राहावे.
आनंदाचे सप्तरंग जीवनात यावे.
हीच आहे आजच्या खास दिवशी सदिच्छा,
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

आनंदी क्षणांनी भरलेले तुझे आयुष्य असावे,
व आयुष्यभर तू माझ्याबरोबर असावे हीच माझी इच्छा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Birthday Sweetheart

ज्या दिवशी तुला प्रथम पाहिले
आजही तो दिवस मला लख्ख आठवतो,
माझ्या मनाच्या वाळवंटामध्ये
तुझ्या रूपाने जणू गुलाबाची कळी फुलली!
Happy Birthday My Love

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!!

जल्लोष आहे गावाचा…
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा…
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आपल्यामध्ये जी काही छोटी-मोठी भांडणे झाली
त्याबद्दल सॉरी म्हणण्याची ही उत्तम संधी आहे.
तू माझ्यासाठी जे काही केले आहेस
त्याबद्दल तुझे मनःपूर्वक धन्यवाद.
लव्ह यू सो मच डिअर.
हॅप्पी बर्थडे…!!!

माझी अशी प्रार्थना आहे की,
तुझ्या आयुष्यात सर्व सुखं येवो.
जे आत्तापर्यंत ते नाही मिळालं
ते सर्व सुख तुला मिळो.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

फुलांनी अमृताचा ठेवा पाठवला आहे.
सूर्याने आकाशातून प्रेमाचा बहर केला आहे,
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
हीच आहे मनापासून मी केलेली इच्छा.

चेहरा तुझा उजळला आहे गुलाबासारखा…
असाच राहो तो कायम मी तुझ्या आयुष्यात असताना किंवा नसताना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आज काल माझ्या स्वप्नांनाही तुझी संगत झाली आहे,
तुझ्यामुळे माझ्या आयुष्याला रंगत आली आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

तू नेहमी निरोगी राहावे,
तंदुरुस्त राहावे आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करावे.
भूतकाळ विसरून जावे आणि
नेहेमी भविष्याकडे मार्गस्थ व्हावे हीच देवाकडे प्रार्थना!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुलाबाच्या फुलांसारखा बहर येवो तुझ्या जीवनात
सुगंधासारखा आनंद दरवळो तुझ्या मनात
हॅपी बर्थडे

सजू दे अशीच आनंदाची मैफील
प्रत्येक क्षण असाच असावा सुखद
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

करोडो
के बस्ती में
एक दिलदार
हस्ती।
Happy birthday bro

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा
उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…

इच्छेच्या समुद्रातील मोती तुझ्या नशिबात असो
तुझ्यावर प्रेम करणारे सतत तुझ्या जवळ असोत
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

दिवस आजचा घेऊन यावा नवा हर्ष विश्वास
शुभ इच्छांचा सोहळा आहे आणि शुभ मधुमास
तुमच्या आयुष्यात घ्यावा दुःखाने संन्यास
समृध्दीच्या वाटेवर व्हावा तुमचा सुखद प्रवास.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!

तुमच्या आनंदाची फुलं सदैव
बहरलेली असावीत
आणि
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक
अनमोल आदर्श बनावे!
ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व
आपल्या आयुष्यात आपणास
हवे ते मिळो..!
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

साखरेसारख्या गोड माणसाला
मुंग्या लागेस्तोवर
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Also Read This
[1000+] Marathi Ukhane | नवरदेव व नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे

Happy Birthday in Marathi Text

या दिवसाची हाक गेली
दूर सागरावरती
अन आज किनारी आली
शुभेच्छांची भरती…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

दिसायला हिरो…
आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..
हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं
ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व
रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा…!

तू आमच्या जीवनातील एक
सुंदर परी आहेस,
मम्मी पप्पांची छोटीसी
बाहुली आहेस.
तूच आमच विश्व आणि तूच
आमचा प्राण आहेस.
लाडक्या लेकीला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आपल्या मैत्रीचे बंध असेच घट्ट बनून राहावे
तुझ्या जगण्यातले दुःख सारे माझ्या वाटेला यावे
जन्मदिनी तुझ्या या मागणे देवाने द्यावे
तू माझ्या आणि मी तुझ्या डोळ्यांनी विश्व पहावे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे.
तुझे कष्ट अपार आहे.
तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे.
तू माझ्या आयुष्याला वळण दिले
हाताचा पाळणा करून मला वाढवले.
तुझे संस्कार माझ्यात रुजवले
कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकलो
किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात
तुझ्यासारखे कोणीच नाही..
प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,
हेच आता देवाकडे मागणे आहे..
आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा…!

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली…
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नको…
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा !!!

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व, जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना…!!!

तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे,
तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे,
जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,
आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आईच्या मायेला जोड नाही,
ताईच्या प्रेमाला तोड नाही,
मायेची सावली आहेस तू,
घराची शान आहेस तू,
तुझे खळखळत हास्य
म्हणजे आईबाबांचे सुख आहे,
तू अशीच हसत सुखात राहावी,
हीच माझी इच्छा आहे…
लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये,
म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी!
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे!
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !!!
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा…!!!

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,
सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,
केवळ सोन्यासारखा लोकांना,
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!!!

दिवस आहे आज खास,
तुला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी आहे ध्यास….
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,
त्याचा सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.
हीच देवाकडे प्रार्थना आहे.
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा…!!!

नाही फरक पड़त
जरी विरोधात गेल संपूर्ण जग व घरदार,
कारण आपल्या मागे आहे आपला भाऊ जोरदार…
वाढदिवसाच्या खुप-खुप शुभेच्छा भावा…!!!

या अनमोल आयुष्यात तुझी साथ हवी आहे,
शेवट पर्यंत सोबतीला तुझा हात हवा आहे,
कितीही संकटे आली आणि गेली,
तरीही ना डगमगणारा तुझा विश्वास
फक्त मला हवा आहे.
प्रिय बायको वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माझ्या प्रिय पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
माझे जग तुझ्यापासूनच सुरु होते
आणि
तुझ्यावरच संपते…
माझ्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद…!!!

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा,
सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या
रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तू या जगात आलास याचा मला खूप आनंद झाला,
आणि खासकरून तू माझ्या जगात आलास…
याचा मला खूपच आनंद होत आहे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
स्वीटहार्ट…!!!

पुन्हा अनुभवावे तुम्ही
आनंदाचे नवे पर्व
आणि तुमच्या आनंदाचे
कारण असावे आम्ही सर्व.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

माझ्या कठीण काळातील आधारस्तंभ
आणि
यशाचे कारण असणाऱ्या
माझ्या आईस
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

विश्वास आणि स्नेहाचे प्रतिकरूप आहे मैत्री आपली.
तुझ्या मैत्रीत जाणवते आत्मीयता,
नेहमीच सोबत असण्याचे आश्वासन,
आणि या संकल्पनेवरच मजबूत आहे
आपल्या मैत्रीचा पाया.
सौख्य आणि समाधानाच्या फुलांनी अविरत
उधळावा सुगंध आनंदाचा तुझ्या जीवनी.
यश, धन, कीर्तीने आणावी जीवनात अपूर्व पर्वणी.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आज आपला वाढदिवस
येणारा प्रत्येक दिवस आपल्याला यश, ज्ञान देवो
आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो.
सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात कायम येत राहो..
आई जगदंबे आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !!!

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये
म्हणुन
संपुर्ण ट्रकच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…!!!

आपण एकमेकांशी जेवढे भांडतो
त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो.
लव्ह यू सो मच.
हॅप्पी बर्थडे किंग…!!!

भावा नाही पळणार मी,
तू ही कुठे नको जाऊ।
वेळ आलितर आपण एकत्र मिळून मार खाऊ,
अस म्हणणाऱ्या माझ्या लाडक्या भावाला
वाढदिवसाच्या अनलिमिटेड शुभेच्छा…!!!!!!!!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

तुझे माझे नाते खास आहे.
कारण तुझे माझ्यावर प्रेम आहे.
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील
पण त्या शुभेच्छामध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील
तुझे रुसवे – फुगवे मला आवडते,
त्यातूनच तुझे माझे नाते फुलते.
हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा
माझ्याकडून प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!!!

कधी रुसलीस कधी हसलीस,
राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,
मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,
पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…
वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये…!!!

दोन्ही हातांनी माझे घरटे सांभाळून…
मला भरारीची उमेद देणारी
प्रत्येक धाडसी निर्णयात बिनधास्त लढ मी आहे,
असा विश्वास देणारी…
हरलो तर कवेत घेणारी आणि जिंकलो तर
अभिमानाने माझ्याच कडे पाहणारी..
स्वतःला पारखण्याची संधी देणारी आणि
माझ्यात मिसळूनही स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व जपणारी…
अश्या माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा…!!!

लाभो संग सज्जनांचा जीवनी तुमच्या,
अन् आशीर्वाद मिळो वाडवडिलांचे,
हितचिंतकांची अशीच गर्दी भोवती जमावी.
हेच सार आमच्या या शुभेच्छांचे..!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

वहिनींचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल Reject करणारे,
नगरचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रांना जीव लावणारे
लाखों पोरींच्या दिलांची धडकन…
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे,
प्रचंड इंटरनेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे ………
या आपल्या भावास वाढदिवसाच्या
कोटी कोटी ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा…!!!

क्षणांनी बनत आयुष्य, प्रत्येक क्षण वेचत राहा..
क्षणी आनंदाच्या उमलत राहा, असतात क्षण दुःखाचेही समर्थाने पेलावेस तेही..
हार असो व जीत हर्ष असुदेत सदैव मनी
अन
आयुष्याच्या प्रत्येक क्षणी असाच बहरत राहा..
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत
माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.
आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,
मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.
वाढदिवसाच्या हैप्पी शुभेच्छा…!!!

तू माझ्यासाठी फक्त माझी पत्नी नाहीस तर,
तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहेस.
ती माझ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवते,
कारण जसे तू मला समजून घेतेस.
तसे इतर कोणीही मला समजून घेणार नाही.
अशा सुंदर बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा,
माझ्या नवरोबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात..
काही चांगले, काही वाईट.
काही कधीच लक्षात न राहणारे
आणि
काही कायमचे मनात घर करणारे…
मनात घर करणारी
जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही !
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

नाती जपली प्रेम दिले
या परिवारास तू पूर्ण केले
पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा
वाढदिवशी हीच एक सदिच्छा…!!!

तू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे,
मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही!
आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद!
वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

तुझ्या आयुष्यात
सर्व चांगल्या गोष्टी घडोत,
भरपूर आनंद आणि सुखदायक
आठवणी तुला मिळोत
आजचा दिवस.

फुलांनी अमृत पेय पाठविले आहे,
सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,
तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार,
तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,
जणू बनलात आमचे श्वास..
तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,
सुख समाधान मिळो तुम्हाला..
तुम्हाला दीर्घायुष्य लाभू दे,
तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,
आम्हा मिळू दे!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही…
पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि
तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको…
वाढदिवसाच्या प्रेम शुभेछा…!

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी,
कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी,
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे,
तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे…
तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा…!
वाढदिवसानिमित्त आपणास खूप खूप हार्दिक शुभेच्छा

सुख, समृद्धी ,समाधान , दिर्घायुष्य ,
आरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित हार्दिक शुभेच्छा…!

झेप अशी घ्या की,
पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की
पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान असे मिळवा की,
सागर अचंबित व्हावा….
इतकी प्रगती करा की
काळही पहात राहावा
कर्तुत्वच्या अग्निबाणाने
धैर्याचे गगन भेदून
यशाचा लखलखीत प्रकाश
तुम्ही चोहीकडे पसरवाल…!
हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शुभकामना…!

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो..
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना…!

जल्लोष आहे गावाचा …
कारण वाढदिवस आहे माझ्या लाडक्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि
हसऱ्या व्यक्तिमत्वास
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझ्या शुभेच्छांनी
तुझ्या वाढदिवसाचा हा क्षण,
एक सण होऊ दे हीच सदिच्छा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या
बहिणीवर राहू दे
सर्व सुखांनी सजलेलं
माझ्या बहिणीचं घर असू दे
हॅपी बर्थडे दी…!

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक
आणि
अनुकूल वडील आहात.
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

पावसाळे मे ऊन पडया
उन्हाळे मे गारा …
थंडी मे पड्या पाऊस…
और तेरा वाढदिवस आज पड्या…
इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे

Also Read This
[500+] मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles | Marathi Kodi

वाढदिवसाच्या शुभेच्छा

संकल्प असावेत नवे तुझे,
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!

प्राणाहून प्रिय बायको
तुला वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा…!

नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…!

यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह –
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!!

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;
आणि
प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

व्हावीस तू शतायुषी,
व्हावीस तू दीर्घायुषी,
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,
मनात आमच्या एकच इच्छा
आपणास उदंड आयुष्य लाभू दे…,
|| वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ||

या Birthday ला तुला
प्रेम, सन्मान, स्नेह आणि
आयुष्यातील सर्व आनंद मिळावा
HAPPY BIRTHDAY

रोज सकाळ आणि संध्याकाळ..
ओठावर असतं तुझं नाव,
भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान,
ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान.
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा…!!!

आई माझी मायेचा झरा
दिला तिने जीवनाला आधार
ठेच लागता माझ्या पायी,
वेदना होती तिच्या हृदयी,
तेहतीस कोटी देवांमध्ये,
श्रेष्ठ मला माझी “आई”
आई आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा

प्रेमाचे तर् माहीत नाही,
पण तु माझ्या
आयुष्यातील पहिली मुलगी
जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप प्रेम भरून शुभेच्छा…!!!

Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Happy Birthday in Marathi

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि
त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव.
!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

प्रत्येक कर्तव्य ते बजवतात,
आयुष्भर ते कर्ज फेडतात…
आपल्या एका आनंदासाठी
संपूर्ण आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा…!!!

तू आहेस म्हणून माझ्या असण्याला अर्थ आहे.
तुला वजा केले तर माझे सारे जगणे व्यर्थ आहे.
प्रिये वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माझ्या जीवनातील प्रत्येक यश अपयशात जी स्त्री,
खंबीरपणे माझ्या सोबत उभी राहिली.
जिने नेहमीच मला सुखात ठेवले,
जिला नेहमीच माझी चिंता असते,
अशा माझ्या प्रिय लाडक्या बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

तुम्ही केवळ एक उत्कृष्ट मित्र, मुलगा, वडील आणि पतीच नाही तर
एक उत्तम मनुष्य देखील आहात…
अशा माझ्या सर्वोत्तम पतीला,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

माझ्या मनातच नाही तर
माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!!

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो.
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो.
आयुष्याला योग्य दिशा देतो,
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो…
हैप्पी बर्थडे मित्रा…!!!

आपल्या प्रेमाचे नाते असेच दिवसेंदिवस बहरतच जावे,
प्रिये, आज तुझ्या वाढदिवशी तू माझ्या प्रेमात भिजावे.
प्रिय बायको वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

इंद्रधनुष्यप्रमाणे तुझेही आयुष्य रंगीत असावे,
तु सदैव आनंदी असावी हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

तू माझा Mr. Perfect आहेस
कारण
जेव्हा मी तुझ्या सोबत असते
तेव्हा सर्व काही बेस्टच असते…
हॅप्पी बर्थडे Mr. Perfect…

दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

ताई
आपणास उदंड आयुष्य लाभो…!
व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाचे आभार मान ज्याने आपली भेट घडवली
तुला एक चांगला आणि हुशार मित्र भेटला
मला नाही मिळाला म्हणून काय झालं
तुला तर मिळाला आहे ना…
हॅपी बर्थडे भावा…

वाढदिवस येतो,
स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो,
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो.
जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो..
आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा !!!

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच,
पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…
बाकी
सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या शुभदिनी
तुम्हाला भरपुर शुभेच्छा …!

नवे क्षितीज नवी पहाट,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो,
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो…!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,
ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!
वाढदिवसाच्या शुभेच्छा…!!!

आयुष्यात सगळी सुख तुला मिळो
फक्त मला बर्थडे पार्टी
द्यायला विसरू नको.
हॅपी बर्थडे…

जगातील सर्वात प्रेमळ आईला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
देव तुमचे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,
एक नवीन स्वप्न घेऊन येतो.
जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,
आयुष्याला योग्य दिशा देतो
जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
आणि
जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.
भूतकाळ विसरून जा आणि
नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो
आणि
सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो…!!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आयुष्य सुंदर बनवणार्‍या सुंदर व्यक्तिला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
हॅप्पी बर्थडे Hubby

सूर्याने प्रकाश आणला आहे
आणि
पक्षी गात आहे,
फुले हसून म्हणाली,
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे…
यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!

तुझ्या वाढदिवसाची भेट,
म्हणून हे एकच वाक्य
मी तुला विसरणं,
कधीच नाही शक्य !!
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!!

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो…
आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
हीच मनस्वी शुभकामना…!!!

आपल्या दोस्ताची किंमत नाही
आणि
किंमत करायला कोणाच्या बापाची हिंमत नाही.
वाघासारख्या भावाला…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

एक वर्ष अजून जिवंत असल्याबद्दल
खूप खूप शुभेच्छा…!!!
हॅपी बर्थडे

आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे
यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा…!!!

नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो
तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा…!!!

जेव्हा मला मिठी हवी असेल
तेव्हा तुझे बाहू उघडे होते.
जेव्हा मला मित्राची गरज असते
तेव्हा तुझे हृदय समजले.
तुझ्या प्रेमाने मला मार्गदर्शन केले
आणि
मला उडण्यासाठी पंख दिले.
!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई !!

देवा माझ्या मित्राला सुखात ठेव,
त्याचा वाढदिवस कधी ही असुदे,
प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच,
मागणे मागतो त्याला आनंदी ठेव…!!!

व्हावीस तू शतायुषी…!
व्हावीस तू दीर्घायुषी…!
हि एकच माझी इच्छा.
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संग्रह आपल्याला नक्कीच आवडेल. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर, नवीन शुभेच्छा आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जर आपल्याला हे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.

जर अजून काही शुभेच्छा तुमच्याकडे असतील कि ज्या खूपच युनिक असतील तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.

याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला भेट द्या.

FAQ’s

वाढदिवसाच्या शुभेच्छा कसे द्यायचे?

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो, आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. प्रत्येक वाढदिवसा गणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो ! तुमच्या समृध्दीच्या सागराला किनारा नसावा, तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत. आपले पुढिल आयुष्य सुख समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!

एखाद्याला मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा द्याव्यात?

वाढदिवस येतो, स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो, एक नवीन स्वप्न घेऊन येतो, जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!

एक चांगला वाढदिवस मजकूर संदेश काय आहे?

तुमच्या वाढदिवसाचे हे, सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो, आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो. हीच मनस्वी शुभकामना.

वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगण्याचा एक अनोखा मार्ग कोणता आहे?

ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल त्या व्यक्तीला सर्वाधिक आनंदी बनवणारा मार्ग अनोखा आहे. यात तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटून काहीतरी भेटवस्तू देऊ शकता. जर तसे शक्य नसेल तर फोनवर बोलून किंवा मेसेज करू शकता.

वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तीन ओळी काय आहेत?

मनाला अवीट आनंद देणारा, तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की, वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा…!!! सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी वाढ दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.

मुलाच्या वाढदिवसाला तुम्ही कसे आशीर्वाद देता?

तू माझ्या आयुष्यातील कधीही न संपणारा सुंगध आणि कधीच न आटणारं प्रेम आहेस. वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा. सोनेरी सूर्याच्या, सोनेरी किरणांचा, सोनेरी दिवस उगवला, सोनेरी क्षणाच्या, सोनेरी शुभेच्छा माझ्या सोन्यासारख्या लेकाला. हॅपी बर्थ डे टू यू बेटा! तूच माझ्या आशेचा किरण आहेस, तूच माझ्या जीवनातील प्रकाश आहेस, तूच माझ्या जगण्याचं कारण आहेस. वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…

सहकर्मीच्या वाढदिवसाला तुम्ही काय म्हणता?

तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण, तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो. आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो.. हीच मनस्वी शुभकामना. तुमचे आयुष्य फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी होवो…!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

मुलासाठी वाढदिवसाची साधी प्रार्थना काय आहे?

आज माझ्या मुलाचा जन्मदिवस आहे. माझ्या स्मार्ट आणि नॉटी बॉय हॅपी बर्थडे टू यू बेटा… माझ्या प्रिय मुला, ज्या दिवशी तू आलास माझ्या जीवनात मला खात्री आहे तेव्हापासून तू नक्कीच होशील एक व्यक्ती खास, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

मी माझ्या मुलीला पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा देऊ?

माझे जग तू आहेस, माझे सुख तू आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील तू अखंड प्रकाश आहे, माझ्या जीवनाचा तूच खरा अर्थ आहेस. तुला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! ज्या दिवशी तुझा जन्म झाला, तो क्षण आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा क्षण होता. या अनमोल क्षणाबद्दल आम्ही परमेश्वराचे कायम ऋणी राहू… बेटा, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊ दे, तुझ्या पंखानी आकाशात उंच भरारी घेऊ दे. तुला उदंड आयुष्य लाभू दे. हिच परमेश्वर चरणी प्रार्थना, तुला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा!

पहिला वाढदिवस ही मोठी गोष्ट आहे का?

हो. नक्कीच! आपल्या बाळाचा पहिला वाढदिवस साजरा करणाऱ्या पालकांसाठी हा मोठा सोहळाच असतो.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply