Marathi Kodi – या लेखात आपण नवीन व सर्वोत्तम मराठी कोडी वाचणार आहोत. आपल्या सर्वांनाच कोडी सोडवायला खूप आवडते. येथे आम्ही आपल्यासाठी जवळपास [500+] लेटेस्ट मराठी कोडी उपलब्ध करून दिली आहेत. याच्या माध्यमातून आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकता. कोडी सोडवून आपण आपल्या मेंदूची क्षमतादेखील वाढवत असतो.
चला तर मग वेळ वाया न घालवता मराठी कोडी जाणून घेऊया. हि कोडी आपण आपल्या मित्रांना शेअर करून त्यांच्याही ज्ञानात भर घालू शकता. जर आपल्याला याव्यतिरिक्त अजून काही कोडी माहिती असतील तर आपण ते खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.
Marathi Kodi
अशी कोणती गोष्ट आहे
जिला माणूस लपवून चालतो,
पण स्त्रिया दाखवून चालतात?
उत्तर – पर्स
अशी कोणती जागा आहे जिकडे रस्ता आहे
पण गाडी नाही जंगल आहे पण झाड नाही,
आणि शहर आहे पण पाणी नाही
उत्तर – नकाशा
दोन भाऊ शेजारी,
भेट नाही जन्मांतरी…
उत्तर – डोळे
लग्नाआधी मुलगी अशी कोणती गोष्ट आहे
जी घालू शकत नाही?
उत्तर – मंगळसूत्र
असा कोण आहे जो तुमच्या नाकावर बसून
तुमचे कान पकडतो?
उत्तर – चष्मा
असे काय आहे
ज्याला कापल्यावर लोक गाणे म्हणण्यास सुरुवात करतात?
उत्तर – वाढदिवसाचा केक
असं काय आहे
ज्यामध्ये सर्व काही लिहिलेले असते
पण ते कोणीही ते वाचू शकत नाही?
उत्तर – भाग्य
अशी कोणती वस्तू आहे
जी सर्व मुले खातात
परंतु त्यांना की आवडत नाही?
उत्तर – पालकांचा मार किंवा ओरड
मी तरुण असतो तेव्हा उंच असतो
आणि जेव्हा मी म्हातारा होतो
तेव्हा मी ठेंगणा होतो,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – मेणबत्ती किंवा पेन्सिल
लोक मला खाण्यासाठी विकत घेतात,
पण ते मला कधीही खात नाहीत,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – प्लेट आणि चमचा
प्रश्न असा आहे की उत्तर काय आहे?
उत्तर – दिशा
एवढस कार्टं घर कसं राखतं?
उत्तर – कुलूप
सुपभर लाह्या, त्यात एक रुपया?
उत्तर – चंद्र आणि चांदण्या
तीन पायांची तिपाई,
त्यावर बसला शिपाई?
उत्तर – चूल आणि तवा
पाटील बुवा राम राम,
दाढी मिशा लांब लांब?
उत्तर – कणीस
दोन बहिणी एकच रंगाच्या,
घट्ट यांचे नाते एक बहिण हरवली तर
दुसरी कामी न येते…
उत्तर – चप्पल
वाचणे लिहिणे दोन्ही ठिकाणी असते माझे काम,
कागद नाही पेन नाही सांगा माझे नाव.
उत्तर – चष्मा
अशी कोणती गोष्ट आहे
जी पाणी पिल्याबरोबर नष्ट होते.
उत्तर – तहान
अशी कोणती वस्तू आहे
जी फ्रीज मध्ये ठेवूनही गरमच राहते.
उत्तर – गरम मसाला
एका राजाची अद्भुत राणी,
दमादमाने पिते पाणी.
उत्तर – दिवा
एक वानर एक खारुताई
आणि एक पक्षी नारळाच्या झाडावर जोराने धावत होते,
तर सांगा सर्वप्रथम केळी कुणाला मिळतील ?
उत्तर – नारळाच्या झाडावर केळी नसतात
जर तुम्हाला तहान लागली असेल तर तुम्ही पिऊ शकता
जर तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही खाऊ शकता
आणि जर थंडी वाजेल तर तुम्ही ते जाळू शकता.
मला सांगा की ते काय आहे?
उत्तर – नारळ
रंगाने काळी आहे,
ती प्रकाशात दिसते पण अंधारात दिसत नाही
मला सांगा की ते काय आहे?
– सावली
असे काय आहे जेव्हा आपण जागे असतो
तेव्हा ते पण जागे राहते,
आपण झोपल्यावर ते हि झोपते.
उत्तर – पापण्या
असं काय आहे जे पती पत्नीला देऊ शकतो?
पण बायको आपल्या नवऱ्याला देऊ शकत नाही.
उत्तर – आडनाव
अशी कोणती गोष्ट आहे जे मे मध्ये असते
पण आणि डिसेंबरमध्ये नाही
ते आगीत आहे पण पाण्यात नाही.
उत्तर – गर्मी
पाणी नाही, पाऊस नाही,
तरी रान कसं हिरवं ,
कात नाही,चुना नाही,
तरी तोंड कसं रंगल…?
उत्तर – पोपट
चार खंडांचा एक शहर,
चार विहीरी बीना पानी,
18 चोर त्या शहरी 1 राणी,
आला 1 शिपाई
सगळ्यांना मारुन मारून विहीरीत टाकी…
उत्तर – कॅरम बोर्ड गेम
सुपभर लाह्या आणि त्यात एक रुपया
उत्तर – चंद्र आणि चांदण्या
कांड्यावर कांडी
आहेत सात कांडी,
त्यावर ठेवली समुद्राची अंडी
उत्तर – ज्वारीचे कणीस
आहे मला तोंड परंतु मी काहीच खात नाही,
दिसते मी झोपलेली, पण असते सारखी पळतही,
माझ्याशिवाय तुमचे, जगणेच शक्य नाही
मी कोण काढा शोधुन ?
उत्तर – नदी
आटंगण पटंगण
लाल लाल रान,
अन् बत्तीस पिंपळांना
एकच पान
उत्तर – तोंड
मी तरुण असतो तेव्हा उंच असतो
आणि जेव्हा मी म्हातारा होतो
तेव्हा मी ठेंगणा होतो,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – मेणबत्ती किंवा पेन्सिल
Also Read This
[1000+] Marathi Ukhane | नवरदेव व नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे
मजेदार कोडे व उत्तर
दोन अक्षरी नाव आहे
नेहमी सर्दी असते नाकावर
कागद माझा रुमाल आहे
माझे नाव काय आहे ते सांगा…?
उत्तर – पेन
दगड फोडता चांदी चकाकली,
चांदीच्या आडात मिळाले पाणी,
सगळे म्हणाले ही परमेश्वराचीच करणी,
ओळखा पाहू मी कोण…?
उत्तर – नारळ
बारीक असते लांब पण असते, तरीही मी काठी नाही
दोन तोंडे आहेत मला, तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण तुम्ही नाही,
ओळखा पाहू मी आहे तरी कोण…?
उत्तर – बासरी
तो वेडा नाही तरीही कागद फाडतो
तो पोलिस नाही तरीही तो खाकी घालतो
मंदिर नाही तरीही घंटा तो वाजवतो
सांगा पाहू मी कोण?
उत्तर – वाहक (कंडक्टर)
नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण…?
उत्तर – कांदा
एका काळ्याकुट्ट राजाची
अद्भुत मी राणी
हळूहळू पिणार मी पाणी
सांगा पाहू मी कोण…?
उत्तर – दिवा
माझे शरीर आहे गोल-गोल,
प्रत्येक स्त्रीचे रूप मी अजून निखारते,
मी बनले आहे काचेची,
प्रत्येक रंगात मी भेटते…?
उत्तर – बांगड्या
रिंग आहे, परंतु बोट नाही
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – फोन
लोखंडाला सुद्धा मी खेचू शकतो,
पण रबरासमोर मी हरतो,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – चुंबक
जगभर मी फिरतो,
पण जमिनीवर ठेवत नाही पाय,
दिवसभर मी झोपतो आणि रात्री मी जागा राहतो,
रात्र आहे काळोखी माझ्या शिवाय,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – चंद्र
खरेदी करताना काळा, जाळल्यावर लाल,
फेकल्यावर सफेद
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – कोळसा
पाण्यातून होतो माझा जन्म आणि पाण्यातच जातो मी मरून,
जेवणाशी आहे माझं जवळच नातं. ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर – मीठ
अशी कोणती गोष्ट आहे जी कितीही चालली,
तरी दमत नाही?
उत्तर – जीभ
असे काय आहे जे तुमचे बोलून झाल्यावर
वेगळे होऊन जातात?
उत्तर – तुमचे ओठ
एक मुलगा 100 फूट शिडीवरून पडला.
पण त्याला काहीच दुखापत का नसेल झाली?
उत्तर – तो पहिल्याच पायरीवर होता.
अशी कोणते गोष्ट आहे जी आपल्याला फ्री मध्ये भेटते,
तरीसुद्धा हॉस्पिटलला गेल्यावर विकत घ्यावी लागते?
उत्तर -ऑक्सिजन
असे काय आहे ज्याला चार चाक
आणि खूप साऱ्या माश्या असतात?
उत्तर – कचऱ्यांचा ट्रक
अशी कोणती गोष्ट आहे
जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते
परंतु एका ठिकाण वरून हलत नाही?
उत्तर – रस्ता
काळा आहे पण कावळा नाही
लांब आहे पण साप नाही
फुले वाहतात पण देव नाही
तर सांगा पाहू मी कोण?
उत्तर – केस
लिहतो पण पेन नाही,
चालतो पण गाडी नाही,
टिक टिक करतो पण घड्याळ नाही,
सांगा बर मी कोण आहे?
उत्तर – टाईपरायटर
असे कोणते ठिकाण आहे
जिथे लग्न न झालेली मुलगी जाऊ शकत नाही?
उत्तर – सासरच्या घरी
अशी कोणती गोष्ट आहे
जी वर्षातून तुम्ही एकदाच विकत घेता
आणि वर्ष संपला कि फेकून देता?
उत्तर – कॅलेंडर
दात आहेत पण चावत नाही,
गुंता होतो काळ्या शेतात,
सगळे माझ्यावर सोपवतात.
सांगा पाहू मी कोण?
उत्तर – कंगवा
असे काय आहे ज्याचं येणं पण खराब आहे
आणि ज्याचं जाणे पण खराब आहे?
उत्तर – डोळे
अशी कोणती गोष्ट आहे,
जिला माणूस लपवून चालतो,
पण स्त्रिया दाखवून चालतात?
उत्तर – पर्स
मराठी कोडी व उत्तरे
जर रामराव हे काजलचे वडील आहे,
तर मग रामराव हे काजलच्या वडिलांचे काय आहे?
उत्तर – नाव
असे काय आहे जे,
तुम्ही झोपता तेव्हा ती सुद्धा झोपते
आणि जेव्हा तुम्ही उठता तेव्हा ती सुद्धा उठते?
उत्तर – डोळ्याची पापणी
असे काय आहे जे पंखापेक्षा अधिक हलका आहे,
परंतु जगातील सर्वाधिक बलवान माणूस देखील
त्याला जास्त काळ रोखून धरू शकत नाही?
उत्तर – श्वास
एका रिकाम्या बॉक्स मध्ये आपण
किती सफरचंद ठेवू शकतो?
उत्तर – एक, कारण त्यानंतर बॉक्स रिकामा राहणार नाही.
अशी कोणती गोष्ट आहे,
जिला आपण कापतो, पिसतो आणि वाटतो सुद्धा
पण आपण खात नाही?
उत्तर – खेळायचे पत्ते
असे कोणते फळ आहे,
जे बाजारात विकले जात नाही?
उत्तर – मेहनतीचे फळ
एक मुलगा आणि एक अभियंता बाजार करण्यासाठी जातात.
तो मुलगा अभियंताचा मुलगा आहे,
पण अभियंता त्या मुलाचे बाबा नाहीयेत.
हे कसे शक्य आहे?
उत्तर – त्या मुलाची आई अभियंता आहे.
असा कोण आहे,
जो आपली सगळी कामे हाताऐवजी नाकाने करतो?
उत्तर – हत्ती
एक माणूस आपल्या बायकोला मारतो.
आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो.
दुसऱ्या दिवशी पोलिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की,
त्याच्या बायकोची हत्या झाली आहे
आणि त्या व्यक्तीला लगेचच गुन्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
तो माणूस घटनास्थळी पोहचताच पोलीस त्याला अटक करतात.
पोलीस त्या व्यक्तीला अटक का करतात?
उत्तर – त्या माणसाच्या बायकोचे शरीर ज्याठिकाणी लपवलेले असते,
त्याचा पत्ता पोलिसांनी त्या माणसाला सांगितलेला नसतो.
आपण कोणत्या प्रकारचे टेबल खाऊ शकतो?
उत्तर – व्हेजिटेबल
एका संगणकाच्या वर बॉम्ब आहे;
संगणकाभोवती हेअर ब्रश, चावी, फोन
आणि एक चहाचा कप आहे.
जर बॉम्बचा स्फोट झाला तर
सर्वप्रथम कोणत्या वस्तूचा नाश होईल?
उत्तर – बॉम्बचा
एका वडिलांनी आपल्या मुलाला एक वस्तू भेट दिली.
आणि सांगितले कि जर तुला भूक लागली तर ती वस्तू खा,
तहान लागली तर पाणी पी.
व थंडी वाजली तर ती वस्तू जाळून टाक.
तर मग वडिलांनी आपल्या मुलाला कोणती वस्तू भेट म्हणून दिली असेल?
उत्तर – नारळ
एकदा एका कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याची मुभा दिली जाते,
परंतु त्यासाठी त्याला तीनपैकी एका खोलीतून प्रवेश करायचा असतो.
पहिल्या खोलीत भयंकर अशी आग आहे,
दुसऱ्या खोलीत विस्फोटक आहे,
कि ज्यांचा त्याच्या पाय ठेवण्याने भयानक स्फोट होऊ शकतो.
तिसऱ्या खोलीत एक सिंह आहे, कि ज्याने मागच्या तीन वर्षांत काहीही खाल्लेलं नाही.
तर त्या कैद्याने कोणत्या खोलीतून गेले पाहिजे?
उत्तर – तिसऱ्या खोलीतून.
कारण मागच्या तीन वर्षापासून काहीही न खाल्लेला सिंह जिवंतच नसेल.
अशी कोणती जागा आहे
जिथे माणूस गरीब असो वा श्रीमंत,
दोघांना सुद्धा प्लेट घेऊन उभा राहावे लागते?
उत्तर – पाणी पुरी खाताना
एकदा एक माणूस रस्त्यावरून चालत असताना अचानक पाउस सुरु झाला.
तो माणूस छत्री आणायचे विसरला होता, तसेच त्याच्याकडे कोणतीही टोपी नव्हती.
त्याचे सर्व कपडे ओले झाले, मात्र डोक्यावरील एकही केस ओला झाला नाही.
असे का?
उत्तर – त्या माणसाच्या डोक्यावर केसच नव्हते.
अशी कोणती गोष्ट आहे जी सगळी मुले खातात,
पण मुलांना ते आवडत नाही?
उत्तर – पालकांचा मार
अशी कोणती गोष्ट आहे जी नेहमीच वाढत जाते
परंतु कधीही कमी होत नाही?
उत्तर – वय
अशी कोणती गोष्ट आहे,
जिला वापरण्याआधी तोडावे लागते?
उत्तर – अंड
थांबून वाजते पण घड्याळ नाही,
बारीक लांब पण काठी नाही,
दोन तोंडची पण साप नाही,
श्वास घेते पण तुम्ही नाही?
उत्तर – बासरी
असं काय असत,
जे मे मध्ये असत, पण
नोव्हेंबर मध्ये नसत…
आगीत असत पण
पाण्यात नसत…?
उत्तर – गर्मी
अशी कोणती इमारत आहे,
ज्यामध्ये तुम्ही प्रवेश करत नाही,
तरीदेखील तुम्ही त्यातून बाहेर पडता…?
उत्तर – ज्याठिकाणी तुम्ही जन्माला येतात ती इमारत.
असे काय आहे, जे पाणी पिल्याने नष्ट होते…
उत्तर – तहान
असं काय आहे, जे कितीही पाऊस आला,
तरी भिजत नाही…
उत्तर – पाणी
असं काय आहे, जिच्या डोळ्यात बोट
टाकली तर ती तोंड उघडते…?
उत्तर – कात्री
कोणत्या महिन्यात लोक सर्वात कमी झोपतात…
उत्तर – फेब्रुवारी
पंख नाही तरीही उडतो,
हात नाही तरीही भांडतो…
ओळखा पाहू मी कोण…
उत्तर – पतंग
माझे वजन काहीही नाही, तरीही आपण मला पाहू शकता.
जर आपण मला बादलीमध्ये ठेवले तर
मी बादलीला अधिक हलके करू शकतो.
ओळखा पाहू मी काय आहे?
उत्तर – एक छिद्र
Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह
Riddles in Marathi
आपल्या डाव्या हातामध्ये आपण जे ठेवू शकता
ते आपल्या उजव्या हातावर कधीही ठेवू शकत नाही.
ओळखा काय ते?
उत्तर – आपला उजवा हात
मी एका टेकडीच्या शिखरावर उभा राहिलो
आणि दोन घरांच्या दरम्यान मोठ्याने घंटा वाजविले.
कोणते घर प्रथम घंटा ऐकेल…
उत्तर – दोन्हीही घरे ऐकू शकत नाहीत,
कारण घरांना कान नसतात.
एका इमारतीच्या 25 व्या मजल्यावरील एक माणूस
खिडकी स्वच्छ करीत आहे.
अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो.
पण त्याला दुखापत होत नाही.
हे कसे शक्य आहे?
उत्तर – कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या स्वच्छ करीत असतो.
सात अक्षरी जिल्हा महाराष्ट्रात
ना असे काना नावात
ना असे मात्रा नावात
ना असे नी वेलांटी नावात
नाव सांगा त्याचे?
उत्तर – अहमदनगर
मुकुट माझ्या डोक्यावर आहे
जांभळा झगा माझ्या अंगावर आहे
आहेत मला काटे जरा सांभाळून
चविष्ट आहे मी खातात मला भाजून
सांगा पाहू मी आहे तरी कोण…
उत्तर – वांगे
कोकणातून आली माझी सखी
तिच्या मानेवर दिली मी बुक्की
तिच्या घरभर पसरल्या लेकी
सांगा पाहू मी कोण…?
उत्तर – लसुन
गोष्ट आहे मी अशी
मला घेता तुम्ही खाण्यासाठी
मात्र मला तुम्ही खात नाही
सांगा पाहू मी कोण ?
उत्तर – ताट
जर आपल्याला तहान लागली असेल,
तर ते आपण पिऊ शकतो..
जर आपल्याला भूक लागली असेल,
तर आपण ते खाऊ सुद्धा शकतो..
आणि थंडी वाजत असेल,
तर आपण त्याला जाळू सुद्धा शकतो
सांगा ते काय आहे?
उत्तर – नारळ
दिवसा झोप काढुनी मी
फिरतो बाहेर रात्रीला मी
आहे असा प्रवासी मी
पाठीला दिवा बांधून मी
कोण आहे मी ?
उत्तर – काजवा
पाच अक्षराचा एक पदार्थ
पहिल्या तीन अक्षराचे होते फुलाचे नाव
पाचवे आणि चौथे अक्षराचा अर्थ मौज
पहिल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अक्षराचा अर्थ नोकर
सांगा पाहू मी कोण?
उत्तर – गुलाबजाम
एका माणसाला बारा मुले
काही छोटी काही मोठी
काही तापट तर काही थंड
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – वर्ष
भाऊराया माझा खूप शैतान
बस तू माझ्या नाकावर
पकडून माझे कान
सांगा आहे तरी मी कोण…
उत्तर – चष्मा
कोकणातून आली एक नार
आहे तिचा पदर हिरवागार
आहे तिचा कंबरेला पोर
सांगा मी आहे तरी कोण…
उत्तर – काजू
अशी गोष्ट जी तुम्ही गिळू शकता
किंवा ती तुम्हाला गिळू शकते
सांगा पाहू ती आहे कोणती…
उत्तर – अहंकार
कोकणातून आला एक भट
त्याला धर की आपट
सांगा मी आहे तरी कोण…
उत्तर – नारळ
कोणता तो चेहरा…
सकाळपासून संध्याकाळ पर्यंत..
आकाशाकडे पाहत राहतो हसत…
उत्तर – सूर्यफूल
माणसासाठी कोणती गोष्ट हानिकारक आहे?
पण लोक अजूनही ते पितात…
उत्तर – राग
दोन बोटांचा रस्ता..
त्यावर चाले रेल्वे..
लोकांसाठी आहे उपयोगाची..
काही सेकंदात आग लावी…
उत्तर – आग पेटी
हा गौरव आहे मेजवानीत बनारसी
ही तिची ओळख वाढवते…
उत्तर – पान
दोन अक्षरात सामावले माझे नाव
मस्तक झाकणे माझे काम.
ओळखा पाहू मी आहे कोण…
उत्तर – टोपी
प्रत्येकाजवळ असणारी अशी गोष्ट कोणती.
जी नेहमीच वाढत जाते कधीही कमी होत नाही…
उत्तर – वय
दोन गुहेचे आहेत दोन रक्षक
दोन्ही आहेत उंच आणि आहेत काळेभोर
सांगा पाहू मी कोण
उत्तर – मिशा
एका कोंबड्याने एका घराच्या छतावर अंडे दिले
तर ते कोणत्या बाजूला पडेल…
उत्तर – कोंबडा कधी अंडी देत नसतो…
डोळा असून सुद्धा
मी पाहू शकत नाही…
उत्तर – सुई
तुम्ही जेवढे त्याच्या जवळ जाल,
तेवढा तो मोठा होत राहील..
सांगा पाहू कोण?
उत्तर – डोंगर
आठवड्याच्या सात वारांचे व्यतिरिक्त
अजून तीन दिवसांची नावे सांगा…
उत्तर – काल, आज, उद्या
नसते मला कधी इंजीन
नसते मला कसलेही इंधन
आपले पाय चालवा भरभर
तरच धावणार मी पटपट
सांगा मी आहे तरी कोण ?
उत्तर – सायकल
नेहमीच असतो मी तुमच्या घरी
तरी काहींनाच मी आवडतो
एकावर एक कपडे मी घालतो
तरीही डोळ्यात पाणी तुमच्या येते
सांगा पाहू मी आहे तरी कोण…
उत्तर – कांदा
मी नेहमी तिथेच असतो
तुम्ही मला फक्त दिवसाच पाहू शकता
रात्री मी तुम्हाला दिसणारच नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर – सूर्य
प्रत्येकाच्या शरीराचा भाग मी आहे
तुम्ही मला डाव्या हाताने पकडू शकता
परंतु उजव्या हाताने नाही
सांगा पाहू मी आहे तरी कोण…
उत्तर – उजवा कोपरा
बारा जण आहेत जेवायला
एक जण आहे वाढायला
ओळखा पाहू मी कोण
उत्तर – घड्याळ
एक कपिला गाय
आहेत तिला लोंखडी पाय
राजा बोंबलत जातो
पण ती थांबत नाही…
उत्तर – रेल्वे
मातीविना उगवला कापूस लाख मन
पडला मुसळधार पाऊस तरीही भिजला नाही एकही कन
ओळखा पाहू मी कोण…
उत्तर – ढग
बारीक असते लांब पण असते तरीही मी काठी नाही
दोन तोंडे आहेत मला तरीही मी गांडूळ नाही
श्वास घेते मी पण तुम्ही नाही
ओळखा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर – बासरी
संपूर्ण गावभर मी फिरते
तरीही मंदिरात जायला मी घाबरते
सांगा पाहू मी आहे तरी कोण
उत्तर – चप्पल
Marathi Puzzles
दात असून सुद्धा मीच आवडत नाही
काळे शेतात गुंता झाल्यावर ती मी सोडती
ओळखा पाहू मी कोण…
उत्तर – कंगवा
पाय नाहीत मला
चाके नाहीत मला
तरी मी खूप चालतो
काही खात नाही मी
फक्त रंगीत पाणी पितो
ओळखा पाहू मी कोण…
उत्तर – पेन
मी कधीही आजारी पडत नाही
तरीसुद्धा लोक मला गोळी देतात
उत्तर – बंदूक
काळे बीज आणि पांढरी आहे जमीन
लावून ध्यान त्यात वहाल तुम्ही सज्ञान
ओळखा पाहू मी कोण…
उत्तर – पुस्तक
सगळीकडे आहे उजेड आणि गाणी
मी तर आहे सणांची राणी
सांगा पाहू मी कोण…
उत्तर – दिवाळी
पांढरे माझे पातेले
त्यात ठेवला पिवळा भात
ओळखेल मला जो कोणी
त्याच्या कमरेत घाला लाथ
उत्तर – उकडलेले अंडे
अवतीभोवती आहे लाल रान
32 पिंपळाना फक्त एकच पान
सांग भाऊ मी कोण
उत्तर – दात आणि जीभ
लाईट गेली माझी आठवण झाली
असो मी लहान किंवा मोठी
माझ्या डोळ्यातुन नेहमी गळते पाणी
सांग मी आहे तरी कोण
उत्तर – मेणबत्ती
मी तिखट मीठ मसाला
मला चार शिंगे कशाला
सांगा पाहू मी आहे तरी कोण…
उत्तर – लवंग
गळा आहे मला पण डोकं नाही मला,
खांदा आहे मला पण हात नाहीत मला.
सांगा भाऊ मी आहे कोण…
उत्तर – शर्ट
मी नेहमी तुमच्या पुढे असतो
तरीही तुम्ही मला पाहू शकत नाही
सांगा पाहू मी कोण
उत्तर – भविष्य
एक काळा घोडा त्यावर बसली पांढरी स्वारी
एक उतरवली आता दुसर्याची पाळी
सांगा पाहू मी कोण
उत्तर – तवा आणि पोळी
ना खातो मी अन्न
ना घेतो मी तुमच्याकडून पगार
तरीही देतो पहारा दिवस रात्र
सांगा पाहू मी आहे तरी कोण…
उत्तर – कुलूप
संपूर्ण पृथ्वीची करतो मी सैर
परंतु कधीही जमिनीवर ठेवत नाही पैर
दिवसा काढून झोपा
रात्रभर मी जागतो
सांगा पाहू मी कोण असतो
उत्तर – चंद्र
एक गोष्ट जी
खायला कुणाला आवडत नाही
पण सर्वांना मिळते…?
उत्तर – धोका
हिरवे असते आणि लाख मोती असते
त्यात आणि असते शाल अंगावर सांगा तर काय.
उत्तर – मक्याचे कणीस
मी काळी आहे पण कोकिळ नाही,
लांब आहे पण काठी नाही,
दोरी नाही पण बांधली जाते
माझे नाव सांगा.
उत्तर – वेणी
अशी कोणती गोष्ट आहे,
जी डोळ्यासमोर येताच डोळे बंद होते.
उत्तर – प्रकाश
वाचण्यात आणि लिहिण्यात
दोन्ही ठिकाणी असते माझे काम
मी नाही कागद मी नाही पेन
सांगा काय आहे माझं नाव?
उत्तर – चश्मा
उंच वाढतो मी रंग आहे हिरवा
तुम्ही फक्त जमिनीत थोडे पाणी मुरवा
प्रदूषण करतो मी कमी
निरोगी पर्यावरणाची देतो मी हमी
सांगा पाहू मी कोण..??
उत्तर – झाड
हरी झंडी लाल कमान,
तोबा तोबा करे इंसांन….
उत्तर – मिरची
हातात आल्यावर शंभर वेळेस कापतो..
आणि थकल्यावर दगड चाटतो..
उत्तर – चाकू
एका आईचे 2 मुलगे
दोन्ही महान भिन्न निसर्ग…
भाऊ भाऊ पेक्षा वेगळा…
एक थंड दुसरा आग…
उत्तर – चंद्र, सूर्य
अशी कोणती गोष्ट आहे
जी बनवण्यासाठी बराच वेळ लागतो
परंतु तो खंडित होण्यास काही क्षण लागत नाही.
उत्तर – विश्वास
प्रत्येकाकडे असे काहीतरी आहे,
पण काहीमध्ये कमी आणि काही मध्ये जास्त आहेत,
ज्याच्याकडे जास्त आहे त्याला शहाणे म्हणतात.
उत्तर – टॅलेंट, प्रतिभा, कला
हिरवा हिरवा दिसावा तो दृढ किंवा कच्चा असेल,
आतून ते रेड क्रीम, कोल्ड स्वीट फ्लेक्ससारखे.
उत्तर – टरबूज
अशा भाजीचे नाव सांगा,
ज्या भाजी मध्ये एका प्रसिद्ध शहराचे
नाव लपलेले आहे…
उत्तर – वांगी आणि शिमला
रात्री 3 ठिकाणी आग लागली आहे.
1 – मंदिर
2 – शाळा
3 – दवाखाना
मग सांगा,
सर्व प्रथम अँबुलन्स कोणती आग विझवेल?
उत्तर – अँबुलन्स आग विझवित नाही.
मी चालले राग राग,
तु का ग माझ्या माग माग…
उत्तर – सावली
रामाच्या वडीलांना एकून चार मुले आहेत.
पहिल्याचं नाव A पैसे. दुसऱ्याचं नाव B पैसे.
चौथ्याचं नाव C पैसे.
मग तिसऱ्याचं नाव काय असेल?
उत्तर – रामा
एवढं मोठं घर आणि त्याला एकच राखनदार…
उत्तर – कुलूप
तुमच्या आत्याच्या मुलीच्या मामाच्या मुलाचे
वडिलांचे भाऊ तुमचे कोण?
उत्तर – काका
ती धावत पळत समुद्रातून येते आणि
किनाऱ्यावर आल्यावर नाहीशी होते.
ओळखा पाहू ती कोण ?
उत्तर – लाट
ऊन बघता मी येतो,
सावली पाहता मी लाजतो,
वाऱ्याचे स्पर्श होताच
मी नाहीसा होतो.
सांगा मी कोण?
उत्तर – घाम
Also Read This
[200+] घरांची आकर्षक नावे | घराच्या नावांची यादी | Home Names in Marathi
Latest Marathi Riddles with Answers
कोकणातून येतो, देश विदेशात जातो.
मोठेही याला बघून होतात लहान,
असा याचा महिमा महान.
पिवळा, केशरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा.
ओळखा कोण?
उत्तर – आंबा
आकाशातून पडली घार,
तिला केलं ठार.
रक्त प्यायलं घटाघटा,
मांस खाल्लं पटापट.
उत्तर – नारळ
दोन पाय मोठे दोन पाय लहान,
शेतात राबतो ताकद महान
उत्तर – ट्रॅक्टर
इथेच आहे पण दिसत नाही…?
उत्तर – वारा
तुम्ही दहा रुपयांमध्ये अशी कोणती वस्तू खरेदी कराल,
ज्यामुळे तुमची खोली पूर्ण भरेल?
उत्तर – दहा रुपयाची अगरबत्ती घेईन
आणि त्याच्या सुगंधाने संपूर्ण खोली भरून जाईल.
असा कोण आहे
ज्याच्या जवळ पंख नसून सुद्धा तो उडतो?
उत्तर – पतंग
असा कोण आहे
ज्याला मारताना लोकांना खूप मज्जा येते?
उत्तर – ढोल
अशी कोणती खोली आहे
ज्याला कोणताच दरवाजा आणि कोणतीच खिडकी नाही?
उत्तर – मशरूम
अशी कोणती गोष्ट आहे
जी तुम्हाला देण्याअगोदर तुमच्याकडून घेतली जाते?
उत्तर – तुमचा फोटो
असा कोण आहे ज्याच्याकडे झोपण्यासाठी पलंग नाही,
राहण्यासाठी महाल नाही
आणि विशेष म्हणजे त्याच्याकडे एक रुपया सुद्धा नाही,
तरीही तो राजा आहे.
उत्तर – सिंह
असे काय आहे जे फाटते परंतु
त्या मधून आवाज येत नाही?
उत्तर – दूध
अशी कोणती गोष्ट आहे
ज्याला मान आहे पण डोके नाही?
उत्तर – बाटली
असे काय आहे
जे कोपऱ्यात राहून जगभर प्रवास करते?
उत्तर – शिक्का
असे काय आहे जे आपल्याकडे
असताना आपण दुसऱ्याला सांगू शकतो
पण आपण इतरांना सांगितल्यावर ते आपले राहत नाही?
उत्तर – गुपित
जो माणूस ते निर्माण करतो ते तो वापरत नाही,
जो माणूस त्याला खरेदी करतो त्याला त्याची गरज नसते,
जो माणूस त्याचा वापर करतो त्याला ते माहीत नसते,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – एक ताबूत
मी उडू शकतो पण मला पंख नाहीत,
मी रडू शकतो पण मला डोळे नाहीत,
मी जिथे जातो तिथे अंधार माझ्या मागे येतो,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – ढग
असे काय आहे
ज्याचे नाव घेतल्या घेतल्या ते अदृश्य होते?
उत्तर – शांतता
तुम्ही मला पाण्यात पाहू शकता
पण मी कधीही ओली होऊ शकत नाही,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – प्रतिबिंब
गोल आहे पण बॉल नाही,
शेपटी आहे पण प्राणी नाही,
सारी मुले माझी शेपटी धरून खेळतात,
पण तरीसुद्धा मी रडत नाही,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – फुगा
चौकीवर बसली एक रानी,
तिच्या डोक्यावर पाणी
उत्तर – मेणबत्ती
आपण जेवढे पुढे जातो
तेवढे आपण पाठीमागे सोडत जातो?
उत्तर – पाऊल
हिरवी पेटी काट्यात पडली,
उघडून पाहिली तर मोत्याने भरली?
उत्तर – भेंडी
काळ्या रानात हत्ती मेला,
त्याचा पृष्ठभाग उपसून नेला?
उत्तर – कापूस
अशी कोणती गोष्ट आहे
जी चोर चोरी करू शकत नाही?
उत्तर – ज्ञान
ती माय माउली जग तिच्यावर जगते,
घामाचा ती वास घेते, मोत्याची ती रास देते?
उत्तर – जमीन
ना अन्न खातो न पगार घेतो,
पण तरही पहारा दिवस रात्र देतो. सांगा बरं कोण?
उत्तर – कुलूप
कंबर बांधून घरात राहते,
सकाळ संध्याकाळ कामी येते.
उत्तर – झाडू
काळी आहे पण कोकिळा नाही.
लांब आहे पण दांडी नाही.
दोरी नाही पण बांधली जाते.
सांगा पाहु मी कोण?
उत्तर – वेणी
काट्याकुट्यांचा बांधला मोठा भारा
निघालास कुठे शेंबड्या पोरा
ओळखा पाहू मी कोण ?
उत्तर – फणस
माझ्याकडे बऱ्याच Keys आहेत
तरीही मी कोणते कुलूप उघडू शकत नाही,
सांगा मी आहे कोण…?
उत्तर – Keyboard
बहुतेक लोकांना मीच घाबरवतो,
मी इशारा न देता हल्ला करू शकतो
कारण मला थांबवता येत नाही.
मी काय आहे?
उत्तर – मृत्यू
दिसत नाही पण परिधान केले आहे,
हे एका स्त्रीचे रत्न आहे…
उत्तर – लाज
असं काय आहे जे आपण उचलता आणि
ठेवता आणि त्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही.
उत्तर – पाऊल
मुकूट याच्या डोक्यावर,
घातलाय जांभळा झगा अंगावर.
उत्तर – वांगे
Marathi Kode With Answers
तुम्ही मला पाण्यात पाहू शकता
पण मी कधीही ओली होऊ शकत नाही,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – प्रतिबिंब
मी कधीच प्रश्न विचारत नाही परंतु
नेहमी उत्तर देते. सांगा पाहू मी कोण?
उत्तर – दारावरची बेल
मी छिद्रांनी भरलेला आहे,
परंतु तरीही भरपूर पाणी मी स्वतःमध्ये ठेऊ शकतो.
सांगा बघू मी कोण?
उत्तर – एक स्पंज
चार पाय आहेत,
परंतु चालू शकत नाही,
ओळख पाहू मी कोण?
उत्तर – एक टेबल
मी हवेपेक्षा हलका आहे परंतु
दहा लाख माणसे मला वर उचलू शकत नाहीत,
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – बुडबुडा
रंग आहे माझा काळा,
उजेडात मी दिसते,
अंधारात मी लपते
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – सावली
तीन हात व पोट आहे गोल,
गर्मीमध्ये होतो माझा उपयोग
ओळखा पाहू मी कोण?
उत्तर – पंखा
अशी कोणती जागा आहे,
जिकडे रस्ता आहे पण गाडी नाही,
जंगल आहे पण झाड नाही,
आणि शहर आहे पण पाणी नाही?
उत्तर – नकाशा
काही मराठी चित्रपटांची नावे ओळखा पाहू…
🔩 🎨 | नटरंग |
🌍 दारी | दुनियादारी |
⌚ पास | टाइमपास |
💉 🌅 🍋 te | Dr. प्रकाश आमटे |
👃💨 | नाकाबंदी / श्वास |
💣💥 | धूम धडाका |
♦ 👑 | चौकट राजा |
👆डाव 💀 | एक धाव भूताचा |
➖➖➖👦 | बिनकामाचा नवरा |
💘 👦👧 📖 | प्यार वाली लव्ह स्टोरी |
7 आत 🏠 | सातच्या आत घरात |
समारोप
तर हे होते काही मराठी कोडी. आम्हाला नक्कीच खात्री आहे कि या कोड्यांच्या माध्यमातून आपण आपल्या ज्ञानात नक्कीच भर घालाल. हि मराठी कोडी आपण आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा. याच प्रकारचे अजून काही कोडी जर तुमच्याकडे असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आम्ही त्यांनाही नक्कीच Add करू.
अशाच प्रकारच्या दर्जेदार माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या आमच्या ब्लॉगला नक्की भेट द्या.
FAQ’s
कोडे म्हणजे काय?
कोडी हा एक खेळ आहे. ज्यात तुमचे ज्ञान तपासले जाते. एखादा प्रश्न विचारून व्यक्ती त्या प्रश्नाचे किती कल्पकतेने उत्तर देऊ शकतो हे यात बघितले जाते.
कोडी तुमच्या मेंदूसाठी चांगली आहेत का?
हो. कारण नियमितपणे कोडी सोडवल्याने आपल्या स्मरणशक्तीत वाढ होते. तसेच तुम्ही तणावमुक्त राहून एकाग्र होण्यासाठीही कोडी चांगली आहे.
एक कोडे उद्देश काय आहे?
तुमची स्मरणशक्ती वाढवणे, तुमचा हजरजबाबीपणा वाढवणे, तुमची एकाग्रता सुधारणे, तणाव कमी करणे हि कोड्याची उद्दिष्ट आहे.
तुम्ही दररोज कोडी सोडल्यास काय होईल?
नियमितपणे कोडी सोडवल्यास आपल्या जीवनात त्याचा खूप सारा फायदा होईल. आपले तर्क, कौशल्ये यांच्या द्रुढीकरणात वाढ होईल.
कोडे सोडवण्याचे काय फायदे आहेत?
स्मरणशक्ती वाढणे, ज्ञानात भर घालणे, एकाग्रता सुधारणे, ताणताणाव कमी होणे, हजरजबाबीपणा वाढणे, एखाद्या समस्येचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याचे कौशल्य कोडी सोडवल्याने प्राप्त होते. हे नियमितपणे कोडी सोडवण्याचे फायदेच सांगता येईल.
तुम्ही कोडी पटकन कशी सोडवाल?
रोजच्या रोज सराव करून, वाचन करून, प्रश्नाचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करून तुम्ही कोडी पटकन सोडवू शकता.
असे काय आहे ज्याला आपन नेहमी बंद करतो पन कधी उघडत नाही