[200+] Marathi Shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह | Love Shayari in Marathi

Marathi Shayari

[200+] Marathi Shayari | सुंदर मराठी शायरी संग्रह | Love Shayari in Marathi

Marathi Shayari – आपण येथे सुंदर आणि आकर्षक मराठी शायरी वाचणार आहोत. आपल्याला या मराठी लव शायरी (Love Shayari Marathi) नक्की आवडतील.

मनुष्याच्या आयुष्यात प्रेम हि अशी भावना आहे कि जी प्रत्येकाला हवीहवीशी वाटते. परमेश्वराने जर कोणती अतिशय सुंदर गोष्ट तयार केली असेल तर ती आहे “प्रेम”. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो किंवा जी व्यक्ती आपल्याला आवडते त्या व्यक्तीवरील प्रेम व्यक्त करणे हे आपल्या सर्वांनाच आवडते. आपण प्रत्येक जण कोणावर ना कोणावर प्रेम नक्कीच करत असतो.

मित्रांनो, आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत 200 पेक्षा अधिक मराठी शायरी संग्रह. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीला प्रभावित करण्यासाठी व आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी याचा आपण वापर करू शकता.

Marathi Shayari

तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे,
मला माझ्यासाठी काही नको,
फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे!
तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय,
कळीला त्रास होऊ नये म्हणून
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय.

तु भेटतेस तेव्हा तुला डोळेभरुन पाहतो,
निरोप तुझा घेताना डोळ्यात अश्रू आणतो,
असे का बरे होते,
हेच का ते नाते, ज्याला आपण प्रेम म्हणतो.

आठवण नको तुझी साथ हवी,
तुझ्या प्रेमाची वाट हवी…

असे असावे प्रेम,
केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
असे असावे प्रेम,
केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!

जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खुप रडवते.

काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो,
चमकणाऱ्या प्रत्येक ताऱ्याजवळ तुलाच मागत होतो…

आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

माझं प्रेम, माझं आयुष्य,
माझं सगळ काही तूच आहेस…
कसं सांगू माझं सर्व काही तूच आहेस…

कुणीतरी असावं,
गालातल्या गालात हसणारं..
भरलेच आसवांनी,
तर डोळे पुसणारं..
कुणीतरी असावं,
आपलं म्हणता येणारं..
केलं परकं जगानं,
तरी आपलं करून घेणारं.

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पन,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी
सांगताच येत नाही.

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

गुलाबाने मोगऱ्याला विचारलं …
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
गुलाबाने मोगऱ्याला विचारलं,
आपल्या दोघांत सुंदर कोण आहे …
मोगऱ्याने गुलाबाला सांगितल की सर्वात सुंदर ती आहे,
जी ही पोस्ट वाचत आहे…!

शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण,
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण,
काढशील आठवण माझी जेव्हा,
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण.

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
जीवन सुंदर झालाय माझं,
तुझ्या प्रेमाच्या वर्षावात,
चिंब चिंब मन न्हालंय माझं.

प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
प्रेम ही एक निरागस भावना आहे,
ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
फक्त असतो तो आदर,
आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

तिची वाट पाहून पाहून थकलो मी…
तिच्या नंतर ना कधी हसलो मी,
ना कधी शांत बसलो मी…

थोडस झुरण्याला स्वतःच न उरण्याला
प्रेम म्हणायचं असत.
भविष्याची स्वप्न रंगवत
आज आनंदात जगण्याला प्रेम म्हणायचं असत.

जेव्हापासून तुझ्यावर प्रेम केलंय,
आयुष्याचे अर्थ कळाले,
तुझ्या रूपानेच मला गं,
प्रेमरूपी दैवत मिळाले!

अनमोल जीवनात,
साथ तुझी हवी आहे,
सोबतीला अखेर पर्यंत
हात तुझा हवा आहे,
आली गेली कितीही
संकटे तरीही,
न डगमगणारा
विश्वास फक्त तुझा हवा आहे.

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल…

जिथे तू असेल तिथेच मी असेल,
तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.

“मैत्री ? माझी पुसू नकोस ,
कधी माझ्याशी रूसू नकोस ?,
मला कधी विसरू नकोस ,
मी दूर ?असून सोबत आहोत तुझ्या फक्त
माझ्या मैत्रीची ? जागा कोणाला देऊ नकोस.”

जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?

आठवण हि एक अशी आहे, ती जवळ ही ठेवता येत नाही
आणि समोरच्या व्यक्तीला परत ही करता येत नाही.

Also Read This
[500+] मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles | Marathi Kodi

Marathi Shayari Love

श्वास तु ध्यास तु इतिहास तु भविष्य तु,
गोड तु सुंदर तु मधाळ तु,
माझ्या हृदयाचा धडडणारा आवाज तु…

आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

चुकतोय मी असे वाटले कधी तर हक्काने मला सांगशील ना?
हरवलो मी कुठे कधी जर सावरून मला घेशील ना?

हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

“तुझ्यात “मी”?
माझ्यात “तू”?
प्रेम ? आपले
फुलत राहू…
नजर नको कोणाचे लागव
म्हणून “अधून मधून”? भांडत जाऊ.

आपण मनापासुन प्रेम केलेल्या व्यक्ती आपल्याला
सोडुन जाताना ह्रदयात घर करुन जातात …
पण जाताना त्याच घराचे दरवाजे बंद करुन जातात.

कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.

आठवणीत तुझ्या रमलोय मी,
तुला भेटण्यास आतुर झालोय मी…

अबोल तू अस्वस्थ मी,
अक्षर तू शब्द मी,
समोर तू आनंदी मी,
सोबत तू संपूर्ण मी.

जगातील सर्वात सुंदर मन तुझे आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…

फसवून प्रेम कर,
पण प्रेम करून फसवू नकोस,
विचार करून प्रेम कर,
पण प्रेम करून विचार करू नकोस,
हृदय तोडून प्रेम कर,
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस.

देवाला जे मागितलं ते सर्व मिळाले
पण जेव्हा तुला मागितल
ते देवालाही नाही देता आल.

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही…

तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.

“कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची,
पण ती कधीही बदलणारी नसावी…

प्रेम म्हणजे फक्त
योग्य व्यक्ती शोधणे नव्हे
तर योग्य नाते निर्माण करणे.

जिथे कदर नाही,
तिथे थांबण्यात काही अर्थ नाही…

अगदी कठीण नसते कुणाला तरी समजून घेणे,
समजून न घेता काय ते प्रेम करणे,
खूप सोपे असते कुणीतरी आवडणे,
पण खूप कठीण असते कुणाच्या तरी आवडीचे होणे.

“प्रेमात भीती अन भीतीमध्ये
प्रेम नसाव,
जगाची पर्वा न करता दोघांनी
खुशाल एकमेकांना ? साथ देत जगाव…”

ना सोनं देऊ शकतो ना डायमंड देऊ शकतो,
फक्त आयुष्यभर तुझी साथ देऊ शकतो…

एक क्षण लागतो कुणाला तरी हसविण्यासाठी,
एक क्षण लागतो कुणाला तरी रडविण्यासाठी,
पण एक नजर लागते कुणावर तरी प्रेम करण्यासाठी.

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.

जेव्हा तुम्ही कोणावर प्रेम करता,
आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटावी म्हणून,
देवाकडे त्या व्यक्तीला रोज मागता,
पण ती तुम्हाला भेटत नाही,
तेव्हा समजून घ्या की दुसरे कोणीतरी
तुमच्यावर जास्त प्रेम करतंय,
आणि रोज तुम्हाला देवाकडे मागतंय.

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात,
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…

काय बोलायचं माहिती नसत
तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत…

“पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
मी आरशात पाहतोय फार,
तिची आठवण मला खूप येते यार.”

प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे असावे…

गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी.
चंद्राइतकी सुंदर नकोच…
फक्त परी लाजरी मिळावी.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

यदा-कदाचीत असे घडावे,
मलाही वाटते की प्रेमात पडावे.
कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे.

Also Read This
[500+] Marathi Jokes | भन्नाट मराठी जोक्स व छोटे छोटे विनोद | Jokes in Marathi

मराठी शायरी

प्रेम हे होत नसतं,
प्रेम हे करावं लागतं ,
आपलं असं कुणी नसतं,
आपलंस करावं लागतं…

वाटत कधी कुणी आपलही असाव,
उभ्या आयुष्यात साथ देणारे आपल्यालाही कुणी भेटाव,
दोन पावल सुखात दोन पावल दुखात टाकणार,
आपल्यालाही कुणीतरी भेटाव.

“माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
कितीवेळा अजून पुसू सांगना…
आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
एकदा तरी तू भावना जाणना…”

तुझ्यासाठी कितीही लिहील तरी कमीच वाटत,
कितीही पाहिल, कितीही बोलल, तरी कमीच वाटत…

तुला पाहून फक्त लिहावंस वाटत,
डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत…

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
शोधावा म्हटल,,,
पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही…

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

आयुष्य थोडसंच असाव..
जिथे फक्त तुच दिसावं…

कधी छोटा तर कधी जोरात येतो.
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो…

आठवणी खरंच चांदण्यांसारख्या असतात.
कोणती कधी लुकलुकेल सांगता येत नाही…

हजारों चेहरे बघितले मी,
लाखों चेहरे बघणार,
एक वेळ स्वतःला विसरेन मी,
पण तुझा चेहरा नाही विसरणार.

असे ह्रदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की त्याने ह्रदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्ष करा की त्याने जखम होणार नाही,
अशी नाती तयार करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.

गुलाबाची नाजुक कळी आहेस तु,
चंद्राच्या गालावरची सुंदर खळी आहेस तु,
कोणासाठी काहीही असलीस तरी
माझ्यासाठी तर माझी सुंदर परी आहेस तु…

प्रेम म्हणजे सुंदर पहाट
कधीही न हरवणारी जीवनाची वाट.
आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं
सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न.

माहित नाही मला हक्क आहे कि नाही पण ,
तुझी काळजी करायला खूप आवडत…

प्रेम प्रॉमिस केल्याने नाही,
वेळ आणि साथ दिल्याने वाढतं..!

तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.

तुला पाहून जो आनंद मिळतो तो स्पर्शात नाही.
पाहूनी रूप तुझे माझ्याकडे शब्दच उरत नाही…

जगातील सर्वात सुंदर मन तुझ आहे,
तुझ्या मनाची सुंदरता अपरंपार आहे…

तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे,
तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे.

तू म्हणतेस तूझ एक फुलं माझ्याकडे ऊधार आहे,
अग वेडे कस सांगू ..
तेच तर माझ्या जगण्याचा एक आधार आहे.

माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागणे…

कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार
कोण कितीही काहीही बोलल तरी…
मी तुला माझी बायकोच म्हणनार…

जिवापाड प्रेम करणाऱ्यांना
प्रेम व्यक्तच करता येत नाही…

प्रेम हे वार्‍यासारखे आहे,
तुम्ही ते पाहू शकत नाही,
परंतु तुम्ही ते अनुभवू शकता…

Also Read This
[1000+] Marathi Ukhane | नवरदेव व नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे

Marathi Shayari Prem

भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमीच पडतात,
सोबत तुझ्या प्रत्येक क्षणात
तुझी तारीफ करायला शब्द कमीच पडतात…

नाती असतात “One Time”,
आपण निभावतो “Some Time”,
आठवण काढा “Any Time”,
आपण आनंदी राहा “All Time”,
हेच मागणे माझे देवाला “Life Time”.

तुझ्या सुंदर आठवणीत अश्रुंचाही विसर पडतो.
आठवणीतुन परतताना हा अश्रुच मग साथ देतो.
दिवस ही पुरत नाही तुझी आठवण काढायला,
तुला ही जमत का गं माझ्या आठवणीत रमायला.

तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

रोज बोलणारी व्यक्ती
एक दिवस बोलली नाही तर,
अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं.

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे तुला सांगतां येत नाही,
प्रेम हे असंच असतं ग,
ते शब्दात कधी सांगताच येत नाही.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

गालावर खळी नको तिच्या…
फक्त जरा हसरी मिळावी,
चंद्राइतकी सुंदर नकोच,
फक्त परी लाजरी मिळावी…

खरं प्रेम करणारे सर्वच नसतात,
अर्ध्यावर सोडणारे भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख विसरतात,
अशानांच लोक सभ्य म्हणुन ओळखतात.

सार जग तुझ्यापाठी, माझी आग तुझ्यासाठी
माझी झोप तुझ्यासाठी, माझी जाग तुझ्यासाठी
जीव जगतो उगाच, साद देशील म्हणुनी
वाट पाहतात डोळे, तूच येशील म्हणुनी.

तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणापर्यंत,
मी फक्त तुझीच आहे.

तुझ्यानंतर ह्या जगातील दुसरी मुलगी,
जिच्यावर मी जीवापाड प्रेम करेन,
ती आपली मुलगी असेल.

प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.

तुला माहित आहे का
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल…

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

तुझ्या पुस्तकाची प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास.

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी
शीतलता असावी चांदण्यासारखी
प्रेयसी असावी तर तुझ्यासारखी.

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये,
आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…

तुला पाहिलं त्या क्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याचसाठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.

हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
जीवन एक रंगमंच आहे,
इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येणे
हे त्याहून कठीण आहे…

हळुहळू तुझ्यावर विश्वास ठेवू लागलोय,
हळूहळु तुझ्या जवळ येऊ लागलोय,
हृदय तुझ्या स्वाधीन करायला तर
खूप घाबरतोय मी
पण हळुहळू तुझ्या हृदयाची काळजी करू लागलोय.

आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
विसरून जा तिला जी तुला विसरेल,
बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
जी स्वतः रडून तुला हसवेल.

मराठी शायरी प्रेमाची

मन स्वच्छ पाहीजे
बाकी शरीर तर प्राणी सुध्दा स्वच्छ ठेवतात…

कुणावरही प्रेम करणे हा वेडेपणा,
कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट,
आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो,
त्यानेही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे नशीब.

शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर,
अश्रूंची गरज भासलीचं नसती,
सर्व काही शब्दांत सांगता आले असते तर,
भावनाची किंमतचं उरली नसती.

आपण सगळ्यांनाच आपलं समजतो पण,
प्रत्यक्षात आपलं कोणीच नसतं…

तुझ ते निरागस मन माझ्या मनाला भावलं..
तेव्हाच मी माझ्या हृदयात तुझ्यासाठी स्थान बनवलं..

तु दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले..
जग हे कसं असते शेवटी तूच मला दाखवले…

आहे तो पर्यंत बोलून घे….
नंतर शोधून पण सापडणार नाही.!!

हृदय तोडून गेली ती.
खोटी आश्वासन देऊन गेली ती
स्वतःचे आश्वासन पूर्ण करण्यास
परत येईल का ती…

मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय Share करत नाही…
हृदय तर खुप लांबची गोष्ट आहे…

काटेरी वाटेवर चालायला पायात चपल्ला पाहीजे आणी,
आयुष्यातील संकटावर मात करायला तुझी साथ पाहीजे…

सोडून जाणारे सुकलेल्या फुला प्रमाणे असतात…
त्यांना आयुष्यात कुठच किंमत राहत नाही…

तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची,
तुझी निरागस बडबड कधी,
चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची.

एखाद्याला अंधारात ठेवण्यापेक्षा
स्पष्ट नकार दिलेल बरं…!

हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत…

हृदय तोडणारे खुप आहेत
पन तुटलेल्या हृदयाला सावरणारे हवे आहेत…

कुणीच कुणाचा नसतो साथी,
देहाची आणि होते माती,
आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
कशाला हवी ही खोटी नाती.

वेळ आपली असेल तर सगळेच आपले असतात…
वेळ आपली नसेल तर आपले सुध्दा आपले नसतात…

मी तुझा आहे का नाही हे माहीत नाही पण,
तु फक्त आणी फक्त माझी आहेस…
हे लक्षात ठेव…

तू गेल्यावर शब्द माझे तुझ्यासाठी,
माझ्यासारखे असे काही झूरतात,
माझ्यासारखेच तुझ्यावर ते जिवापाड मरतात.

तुझ्या कडे थोड प्रेम उधार आहे,
अग वेडे तु एकच तर माझा जीवनाचा आधार आहेस…

लिहीता लिहीता पेनाची शाई संपून गेली…
अर्धवट लिहीलेल्या आयुष्याच्या कथेला पुर्ण विराम देऊन गेली…

प्रत्येकाच्या मनात कोणालाही न सांगितलेली
प्रेम कहाणी असते…

प्रेमाची व्याख्या करायला ज्याला जमत नाही…
त्याला प्रेम कधीच उमजत नाही…

प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते…

तुझ्या प्रेमा शिवाय जगणे कठीण आहे,
आणि प्रत्येक श्वासात तुझी आठवण न येणे
हे त्याहून कठीण आहे…

तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो.

रक्ताची नाती ही कमी पडतात
पण प्रेमाच नात सर्वांना पुरून उरणार असत…

कोणाला काय सांगणार आणि कस सांगणार
कोण कितीही काहीही बोलल तरी…
मी तुला माझी बायकोच म्हणनार…

Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Marathi Love Shayari Romantic Text

“नात….. म्हणजे काय….?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
आणि
कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.”

हरवलीस तु आभाळात
आनंदी आनंद तुझ्या आयुष्यात…

तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं.

बऱ्याचदा विसरायचं म्हटलं की,
सगळंच आठवतं…

प्रेम केल्यानेच प्रेम समजतं…

तुझ्या विचाराइतकं देखणं दुसरं काहीही नाही…

तू साधी आहेस पण,
खरंच माझी आहेस…

आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त माझ्या आईची तु सुन पाहीजे…

तुला माहित आहे का ?
मी या जगात सर्वात जास्त कोणाला Like करतो,
या status मधला पहिला शब्द वाच मग कळेल…

कधीच कोणत्या गोष्टीसाठी जेवढा जीव तळमळला नाही,
तेवढा तुझ्याशी बोलायला तळमळतो…

नात… म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये,
आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये…

आठवण तर कधी येणारच नाही ,
तुझी माझ्याकडे कोणतीही गोष्ट ठेवली नाही तु तुझी…

नात्याला मायेचा ओलावा मिळाला,
तरच ते बहरते,
आणि खुप काळ टिकून राहते…

रस्ता बघून चल.
नाहीतर एकदिवस असा येईल की
वाटेतले मुके दगडही प्रश्न विचारू लागतील.

तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करणे मला काही जमत नाही,
तुझ्या आठवणी शिवाय, मन मात्र कशात रमत नाही.

हृदय तोडून प्रेम कर
पण प्रेम करून हृदय तोडू नकोस…

जगावे असे कि मरणे अवघड होईल,
हसावे असे की रडणे अवघड होईल,
कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
मला कधी जमलंच नाही, कारण,
तुझ्याशिवाय माझ मनं,
दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही.

मैत्री हसणारी असावी,
मैत्री रडणारी असावी,
प्रत्येक क्षणाच्या आनंद घेणारी असावी,
एक वेळेस ती भांडणारी असावी,
पण कधीच बदलणारी नसावी.

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले हा मराठी शायरी संग्रह आपल्याला नक्कीच आवडेल. आम्ही याठिकाणी अतिशय सुंदर शायरी आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जर आपल्याला हे आवडले असतील तर आपल्या जवळच्या व्यक्तीला अवश्य शेअर करा.

जर अजून काही शायरी तुमच्याकडे असतील तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.

याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply