[1000+] Marathi Ukhane | नवरदेव व नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे

Marathi Ukhane

[1000+] Marathi Ukhane | नवरदेव व नवरीसाठी सुंदर मराठी उखाणे

Marathi Ukhane – या लेखात आपण नवीन व सर्वोत्तम असे महिला, पुरुषांसाठी लग्न, विविध सण-समारंभ, विशेष कार्यक्रम प्रसंगी उपयोगी येणारे लेटेस्ट, आकर्षक मराठी उखाणे वाचणार आहोत.

आपल्याकडे विविध सण-समारंभ, विविध सोहळे जसे की लग्न समारंभ, घास भरविणे, सत्यनारायण महापूजा, डोहाळे जेवण किंवा इतर कोणताही विशेष कार्यक्रम असो यामध्ये प्रामुख्याने एक परंपरा आपल्याला प्रामुख्याने पहावयास मिळते ती म्हणजे नाव घेणे. यावेळी प्रत्येक व्यक्तीला नाव घेण्याचा आग्रह केला जातो, विशेषतः नवीन जोडपे जर असेल तर प्रत्येक सण, विशेष कार्यक्रम याप्रसंगी त्यांना नाव घेण्याचा आग्रह केला जातो. आपल्या महाराष्ट्रात नाव घेण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे.

Marathi Ukhane

ज्यावेळी एखाद्या समारंभात आपल्याला उखाणा घेण्यासाठी आग्रह केला जातो, त्यावेळी आपल्याला “कोणता उखाणा घ्यावा”? असा प्रश्न पडतो. जर आपल्याला उखाणाच तोंडपाठ नसेल तर मग आपली चांगलीच पंचाईत होते. हीच अडचण लक्षात घेऊन आम्ही आपल्यासाठी विविध प्रकारचे मराठी उखाणे घेऊन आलो आहोत. यामध्ये आम्ही विविध संवर्ग उपलब्ध करून दिले आहेत. याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आम्हाला खात्री आहे.

नवरदेवासाठी मराठी उखाणे

काही शब्द येतात ओठांतून,
………. चं नाव येतं मात्र हृदयातून.

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.

लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम,
………. ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.

नववारी साडीचा, खूप सुंदर आहे साज,
…………चे नाव घेतो, तिला नजर नको लागो कोणाची आज.

पुरणपोळीत तूप असावे साजूक,
…………..आहेत आमच्या नाजूक.

गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ,
………. ने दिला मला प्रेमाचा हात.

तसा मला काही शौक नाही
पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता
………. च्या प्रेमात पडली माझी विकेट.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…….. च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,
प्रथम दर्शनीच भरली …………… माझ्या मनात.

संसार म्हणजे, दोन घरांना जोडणारा पूल,
……. च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

सीतेसारखे चरित्र, लक्ष्मीसारखे रूप,
मला मिळाली आहे …………… अनुरूप.

जाईजुईचा वेल पसरला दाट,
…….. बरोबर बांधली जिवनाची गाठ.

भाजीत भाजी मेथीची,
………… माझ्या प्रीतीची.

हो-नाही म्हणता म्हणता
लग्न जुळले एकदाचे,
………. मुळे मिळाले मला
सौख्य आयुष्यभराचे.

मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
……………….. चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
………. झाली आज माझी गृहमंत्री.

देव आमचा विठोबा, विटेवरी उभा,
….. ने वाढवली, आमच्या घराची शोभा.

संसाररूपी सागरात पतीपत्नीची नौका,
……………. चं नाव घेतो सर्वांनी ऐका.

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो …….. ची जोडी.

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल,
……………. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

चांदीच्या ताटात रूपया वाजतो खणखण,
………………. चं नाव घेऊन बांधतो कंकण.

श्रीकृष्णाने केला पण, रुक्मिणीलाच वरीन,
…………… च्या सोबत, आदर्श संसार करिन.

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
………………. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
…… च्या गळ्यात घातला मंगळ सुत्राचा हार,

अस्सल सोने चोविस कॅरेट,
……….. अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
………………. बरोबर बांधली जीवन गाठ.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
………. सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.

दवबिंदूच्या थेंबाने चमकतो फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात ………….. च्या संग.

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
माझी ………. नाजूक जसे गुलाबाचे फूल.

सूर्य चंद्राला पाहून, भरती-ओहोटी येते सागराला,
…………….. ची जोड मिळाली, माझ्या जीवनाला.

नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
…………….. आहे माझे जीवन सर्वस्व.

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
…………….. चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

एक होती चिऊ, एक होता काऊ,
……………चे नाव घेतो डोक नका खाऊ.

श्रावण महिन्यात असतात खूप सण,
……………… सुखात ठेवीन हा माझा पण.

अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर,
………………. माझी सर्वांपेक्षा सुंदर.

संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी,
…………. मुळे लागली मला संसाराची गोडी.

आयुष्याच्या वळणावर, अडचणी आल्या खूप,
अखेर मन प्रसन्न झाले, ……………. चे बघून रूप.

काय जादू केली, जिंकलं मला क्षणात,
प्रथम दर्शनीच भरली ……… माझ्या मनात.

दुधाचे केले दहि, दह्याचे केले ताक, ताकाचा केला मठ्ठा,
………….. चे नाव घेतो …….. रावांचा पठ्ठा.

मायामय नगरी, प्रेममय संसार,
…….. च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.

Also Read This
[500+] मराठी कोडी व उत्तरे | Best Marathi Riddles | Marathi Kodi

Marathi Ukhane for Male

प्रेमाच्या ओलाव्याने, दुःख झाली कोरडी,
………….माझ्या जीवनी, चांदणे शिंपीत आली.

मंथ एंड आला कि, भरपूर वाढते काम,
ऑफिसमध्ये बॉस आणि घरी
…………… कटकट करते जाम.

मोगऱ्याची कळी उमलली असता,
दरवळतो सर्वत्र सुगंध,
…………. च्या सोबतीत मिळेल जीवनाचा आनंद.

दवबिंदूनी चमकती, फुलांचा रंग,
सुखी आहे संसारात, …………… च्या संग.

जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला …………………… प्रेमपुतळी…

एक दोन तीन चार,
…………… वर आहे, माझे प्रेम फार.

मधाची गोडी आणि फुलांचा सुगंध,
……………… मुळे कळला मला, जीवनाचा आनंद.

कळी हसून फुल उमलले, मोहरून येईल सुगंध,
………………. च्या संगतीत सापडला जीवनाचा आनंद.

राधे शिवाय कृष्णाला नाही अर्थ,
………… शिवाय माझं सगळ जीवन व्यर्थ.

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ,
…………… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.

सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग,
………………… माझी नेहमी घरकामात दंग…

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
……………….. माझी जसे गुलाबाचे फुल…

रुप्याचे ताट, त्यावर सोन्याचे ठसे,
……………..चे रूप पाहून चंद्र सूर्य हसे.

उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात,
माझ्या प्रेमाचा हार ……………….. च्या गळ्यात…

प्रेमाच्या रानात नाचतो मोर,
………. शी केलं लग्न, नशीब माझं थोर.

टोपलीत टोपली, टोपलीत भाज्या,
………. माझी राणी, मी तिचा राजा.

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
……………. चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान…

प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,
…………… च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.

सूर्याच्या किरणांचा प्रकाश पडला लख्ख
माझ्या वर …………………… चा पूर्णपणे हक्क…

तसा मला काही शौक नाही
पहायचा क्रिकेट,
पण बघता बघता
………. च्या प्रेमात पडली माझी विकेट.

भाजीत भाजी मेथीची,
………… माझ्या प्रीतीची.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
………. आहे माझी ब्युटी क्वीन.

हो-नाही म्हणता म्हणता
लग्न जुळले एकदाचे,
………. मुळे मिळाले मला
सौख्य आयुष्यभराचे.

सितेने केला पण रामालाच वरीन,
………….. च्या साथीने आदर्श संसार करीन…

अस्सल सोने चोविस कॅरेट,
……………….. अन् माझे झाले आज अरेंज / लव्ह मॅरेज.

काही शब्द येतात ओठातून,
….चं नाव मात्र येतं हृदयातून.

सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,
……….. चं नाव घ्यायला खूप घाई झाली.

भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,
………. ची आणि माझी, लाखात एक जोडी.

एक होती चिऊ, एक होता काऊ,
……………चे नाव घेतो डोक नका खाऊ…

ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल,
……………… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

श्रावण महिन्यात असतात खूप सण,
……………… सुखात ठेवीन हा माझा पण.

जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी ………. म्हणजे लाखात सुंदर नार.

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे,
…………… च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे…

कृष्णाला बघून राधा हसली,
…………. माझ्या हृदयात बसली.

एका वर्षात, महिने असतात बारा
………….. मुळे वाढलाय, आनंद सारा…!

मोह नाही, माया नाही,
नाही मत्सर हेवा,
…………..चे नाव घेतो,
नीट लक्ष ठेवा…

नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
……………… झाली आज माझी गृहमंत्री…

डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,
……………. माझी झाल्यापासून जळतात लोक सारी.

………….. माझे पिता …………. माझी माता,
शुभमुहूर्तावर आणली ………… ही कांता.

सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप,
……… मला मिळाली आहे अनुरूप.

दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
…………. सारखी पत्नी मिळाली, आनंद झाला मला…

मुद्दाम नाही करत, नकळत हे घडतं,
माझं मन रोज नव्याने ………….. च्या प्रेमात पडतं.

रूप तिचे गोड, नजर तिची पारखी,
शोधूनही सापडणार नाही,
…………… सारखी.

एका वर्षात असतात महिने बारा,
……….. च्या नावात सामावलाय आनंद सारा.

उंच उंच आकाशात, पाखरांचे थवे,
………….. चे नाव, कायम ओठी यावे.

नंदनवनात अमृताचे कलश,
……………..आहे माझी खूप सालस.

संसाररूपी सागरात पतिपत्नीची नौका,
चे नाव घेतो सर्वजण ऐका………..

चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण,
……………. चे नाव घेऊन सोडतो कंकण…

सोन्याचा मुकुट, जरीचा तुरा,
………….. माझी, कोहिनूर हिरा.

मन आहे निर्मळ, लक्ष्मी सारखं रूप,
………………. माझी देखणी आहे खूप.

तिची नि माझी केमिस्ट्री, आहे एकदम वंडरफुल…
……………… माझी आहे, खरच किती ब्युटीफुल…!

गर गर गोल, फिरतो भवरा,
…………… च नाव घेतो, मी तिचा नवरा.

देऊळाला खरी शोभा कळशाने येते,
……………. मुळे माझे गृहसौख्य गुणावते.

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा.
…………….. च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,
………. तू फक्त, गोड हास.

पुरणपोळीत तुप असावे साजुक,
………… आहेत आमच्या फार नाजुक.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
……… च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने…

तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी,
बघता क्षणी प्रेमात पडलो ………….. ची लाल ओढणी.

समुद्राचे पाणी लागते खूप खारे,
…………. साठी तोडून आणेन मी चंद्र-तारे

गोड मधुर आवाज करी श्रीकृष्णाची बासरी,
…………..ला घेऊन जातो मी तिच्या सासरी.

कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास,
मी भरवितो ………. ला जलेबीचा घास…

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
…………………… च्या जीवनात मला आहे गोडी.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने-फुले,
………….. च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

छोटीशी तुळस, घराच्या दारी,
तुमची ……………. हि आता माझी जबाबदारी.

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा.
………….. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
…………….. च्या साथीसाठी केली लग्नाची तयारी…

वेरुळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
……………… आहे माझी सर्वात सुंदर.

झुळूझुळू पाण्यात चाले हळूहळू होडी,
शोभून दिसते ………….. आणि माझी जोडी.

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान,
……………..च्या रूपाने झालो मी बेभान.

2 अधिक 2 होतात चार,
…………….. बरोबर करीन सुखी संसार.

लहानसहान गोष्टींनीही, आधी व्हायचो त्रस्त,
…………….. आल्यापासून झालंय, आयुष्य खूपच मस्त !

प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमान धावले,
…………. च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.

…………. माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,
तुझ्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

सोन्याची बरणी, भरली तुपाने,
लक्ष्मीच घरात आली, ……………. च्या रूपाने.

खेळायला आवडतो, मला क्रिकेट गेम,
…………… वर आहे माझे खूप प्रेम.

जीवन आहे एक अनमोल ठेवा,
………………. आणते नेहमी सुकामेवा.

अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रुपाचा,
………………… ला घास घालतो वरण-भात-तुपाचा…

मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा,
…………………… ला विचारतो मी “आती क्या खंडाला?”

जंगलात पसरला, मोगऱ्याचा सुवास,
…………….. बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.

घर असावं नेहमी क्लीन अँड नीट,
……………… आहे माझी सिम्पल अँड स्वीट.

देवापुढे मांडले, प्रसादाचे ताट,
……….. मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

केशर-दुधात टाकले,
काजू, बदाम, जायफळ,
………….. च नाव घेतो,
पीडू नका वायफळ.

चांदीच्या वाटीत साखरेचे खडे,
…………. चं नाव घेतो देवापुढे.

गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद,
……………. च्या नावातच, सामावलाय माझा आनंद.

काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात,
प्रथम दर्शनीच भरली …………… माझ्या मनात…

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
……………. चे रुप आहे अत्यंत देखणे.

आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर,
………………. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.

देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले,
……………….. शी लग्न करुन मनोरथ पुर्ण झाले.

असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड,
……………………. च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.

Marathi Ukhane Male Funny

खोक्यात खोका टीव्हीचा खोका,
ती माझी मांजर आणि मी तिचा बोका.

Hangover उतरायला उपयोगी पडते लिंबू,
…… एवढी हॉट असताना, ऑफिसमध्ये कशाला थांबू.

हळदीने लागला, अंगाला पिवळसर रंग,
…………….. माझी नेहमी, घरकामात दंग.

मैदानात खेळत होतो क्रिकेट,
……… ला पाहून पडली माझी विकेट.

गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव,
……. आहे बरी, पण खाते नुसता भाव.

पुढे जाते वासरू, मागून चालली गाय,
…….. ला आवडते नेहमी दुधावरची साय.

एक बाटली दोन ग्लास,
……. आहे माझी फर्स्ट क्लास.

गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू,
…… चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान,
………… ला पाहून झालो मी बेभान.

बाजारातून घेऊन येतो, ताजी ताजी भाजी
…… बरोबर गुलुगुलू करायला मी नेहमीच राजी.

प्रेमाच्या रानात नाचतो मोर,
…….. शी केले लग्न लग्‍न नशीब माझे थोर.

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ,
……… चं नाव घेतो पुढचं नाही पाठ.

पुरणपोळीत तुप असावे साजूक,
………. आहेत माझ्या फार नाजुक.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
……. च्या जीवावर करतो मी मजा.

बागेत बाग राणीचा बाग,
बागेत बाग राणीचा बाग,
आणि
………. चा राग म्हणजे धगधगणारी आग.

कोरा कागद काळी शाई,
……… ला देवळात जायची रोजच घाई.

ब्रम्हदेवाच्या पुत्राचे आहे नाव कली,
तू माझी देवसेना आणि मी तुझा बाहुबली.

शंकराच्या पिंडीला नागाचा वेढा,
……… माझी म्हैस आणि मी तिचा रेडा.

……… ची बाटली आणि काचेचे ग्लास,
सोबत असताना ……… क्वार्टर होते लगेच खल्लास.

साखरेचे पोते सुई ने उसवले,
……. ने मला पावडर लाऊन फसवले.

Also Read This
[1000+] Marathi Suvichar | सर्वोत्कृष्ट मराठी सुविचार संग्रह

Marathi Ukhane for Male Romantic

मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
…………… चे बरोबर बांधली जीवन गाठ.

नाते असावे अतूट, आणि घट्ट,
…………. चे पुरवेन मी, सर्व हट्ट.

तुरीच्या डाळीला जिऱ्याची फोडणी,
बघता क्षणी प्रेमात पडलो …… ची लाल ओढणी.

दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
……………. चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.

पक्षांचा थवा, दिसतो छान,
……….. आली जीवनात,
वाढला माझा मान.

देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
………… चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.

फुलांच्या तोरणात, आंब्याचे पान,
………… च्या नादाने झालो मी बेभान.

जाईच्या वेणीला चांदीची तार,
माझी ……… म्हणजे लाखात सुंदर नार.

घड्याळात आहेत, आकडे बारा,
…………. ला फिरवेन मी, जग सारा.

पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले,
…………….. चं नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
……….. चे नाव घेतो ………. च्या घरात.

आकाशाच्या पोटात, चंद्र, सूर्य, तारांगणे,
…………… च नाव घेतो, तुमच्या म्हणण्याप्रमाणे.

गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा.
…………….. च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.

जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर …………. सारथी.

मातीच्या चुली घालतात घरोघर,
……… झालीस माझी आता चल बरोबर.

पुरणपोळीत तुप असावे साजुक,
………… आहेत आमच्या फार नाजुक.

नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
……….. चे रुप आहे अत्यंत देखणे.

समुद्राचे पाणी, लागते खूप खारे,
……… तुझ्यासाठी तोडून आणेन मी, चंद्र आणि तारे.

डोळ्यावरची बट, दिसते एकदम भारी,
………. माझी झाल्यापासून जळतात सारी.

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे
………….. चे नाव माझ्या ओठी यावे.

हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी,
……………… च्या जीवनात मला आहे गोडी.

बहरली फुलांनी निशीगंधाची पाती,
…………… चे नाव घेतो लग्नाच्या राती.

लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा,
………….. च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.

सोन्याच्या कपावर चांदीची बशी,
…… समोर फिक्या पडतील रंभा, उर्वशी.

गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
……….. आहे माझी ब्युटी क्वीन.

माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,
……. ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.

ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा.
………….. मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.

2 अधिक 2 होतात चार,
…………….. बरोबर करीन सुखी संसार.

प्रभू श्रीरामासाठी श्री हनुमान धावले,
…………. च्या आयुष्यात टाकतो मंगलमयी पावले.

माझ्या डोळ्यात बघून, ती ओळखते सारे,
…………….. सोबत आहे, माझे नाते न्यारे.

नवरीसाठी मराठी उखाणे

चालली सप्तपदीचे, सात पावले,
………. रावांच्या नावाने, मंगळसूत्र बांधले.

लग्नाच्या पंगतीत केलीय फुलांची आरास,
………. रावांचे नाव घेण्यास,
आजपासुन करते सुरवात.

पतिव्रतेचा धर्म नम्रतेने वागते,
………. रावाचं नाव घेऊन आशीर्वाद मागते.

पायातल्या जोडव्यात माहेरची स्म्रुती,
………. रावांच्या स्नेहाने गेली माझी भिती.

नाही मोठेपणाची अपेक्षा,नाही दौलतीची इच्छा,
………. रावांच्या संसारी आपणा सर्वाच्या शुभेच्छा.

उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात ……….आणि ………… ची जोडी आहे जबरदस्त.

ॐ नमोजी आद्या ने ज्ञानेश्वरीची होते सुरुवात,
……………. राव आणि माझी जोडी ठेव सुखात.

शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान,
……….. रावांचे नाव घेते राखुन सर्वांचा मान.

संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
………. रावांशी लग्न झाले, झाली माझी इच्छापूर्ती.

दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता,
………. रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.

दोन जीवांचे मिलन जणु शतजन्माच्या गाठी,
………. रावांचे नाव घेते, खास तुमच्या आग्रहासाठी.

कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात दिले,
…………… रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.

जाईजुईचा वेल पसरला दाट,
……….रावां बरोबर बांधेल जीवनाची गाठ.

सासू सासऱ्यांच्या छायेत, मला नाही काही कमी,
…………… राव हेच माझ्या, सर्वस्वाचे स्वामी.

उखाणा घे उखाणा घे, करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने ………….. रावां सारखे पती लाभले मला.

लग्नाचे बंधन,जन्माच्या गाठी,
………… रावांचे नाव घेते तुमच्यासाठी.

प्रेमाच्या रेशीम धाग्यांनी, सौख्य मी विणले,
……….. रावांच्या साथीने, जीवनपुष्प बहरले.

लग्नमंडपात निनादतात सनईचे सूर,
……… रावां च्या साठी आई वडिलांचे घर केले दूर.

संसाररुपी सागरात प्रेमरुपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करते ……… रावांबरोबर.

लग्न आटपले, आणि काढली वरात,
………. सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.

Marathi Ukhane for Female

दारापुढे काढली, सुंदर रांगोळी फुलांची,
………….. च नाव घेते, सून मी …………. ची.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले,
……………. रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले.

मोगऱ्याचा सुगंध, पावसाळ्यातील मृदगंध,
………… रावांशी जुळले आता, रेशमी ऋणानुबंध.

जुईची वेणी जाईचा गजरा,
आमच्य़ा दोघांवरती सगळ्यांच्या नजरा.

हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम,
……….. रावांचे चरण, हेच माझे चार धाम.

मान्सूनचे आगमन, पर्जन्याची चाहूल,
……… रावांचे नाव घेते, टाकते मी पहिले पाऊल.

सुगंधात न्हाल्या दिशा धुंद दाही,
………… रावांचे नाव हळूच ओठी येई.

सूर्याने दिली साडी, चोळी आणि गोफ,
……….. रावांच्या मांडीवर ………….. घेते झोप.

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी,
………………. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी.

सोन्याची अंगठी चांदीचं पैंजण,
………. रावांचे नाव घेते, ऐका गुपचूप सर्वजण.

तेलाच्या दिव्याला तुपाची वात,
……… रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात.

संसाराची सुरवात, सर्वांच्या आशीर्वादाने करेन,
……………. रावांचे मी, आजपासून सर्व ऐकेन.

चांदीच्या वाटीत सोन्याचा चमचा,
……….. रावांचे नाव घेते, द्या आशीर्वाद तुमचा.

काढ्यात काढा पाटणकर काढा,
……….. रावांचे नाव घेते,
सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा.

संसारात स्त्रीने, नेहमी रहावे दक्ष,
……….. रावांचे नाव घेते, इकडे द्या लक्ष.

अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती,
काल होते मी युवती,
आज झाले …………. रावांची सौभाग्यवती.

सासरचे निराजंन माहेरची फुलवात,
………. रावांचे नाव घेण्यास करते सुरुवात.

मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर,
……………… रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.

आमचे लग्न होईल कि नाही,
अखेर स्वप्न झाले साकार,
………. रावांनी खूप कष्ट केले,
मिळण्यासाठी घरंच्याकडून होकार.

जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
……….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.

हिरवा चाफा, कमळ निळे,
……………. मी सुखी आहे, कारण तुमच्यामुळे.

दोन जीवांचे, जातक जुळले,
……………… रावांमुळे सुख काय आहे, ते कळले.

आई-वडिलांचा आशीर्वाद, नाही उणे कशाचे,
……………… रावांमुळे आज, दिवस पाहते सुखाचे.

घालते मी शुभप्रभाती, पाणी तुळशीला,
………………. रावांनी मला, बायको करून आणली मुळशीला.

हा लाख मोलाचा ऐवज सारा, मी तुमच्या हवाली करते,
………………. राव मला नको अजून काहि, मी फक्त तुमच्यावर मरते.

लग्नाचे आहे हे पर्व, संपत्तीचा नसावा गर्व,
………….. रावांचे नाव घेते, ऐकताना सर्व???

देवळात प्रवेश करण्यासाठी, नाही कुणाला बंदी,
………….. रावांच्या आयुष्यात येण्याची, भेटली मला संधी.

गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध,
……………. रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध.

जुळल्या रेषा नशिबाच्या, येता हाती हात,
……………… आणि …………. ची जोडी बघताच, सर्व म्हणतात क्या बात, क्या बात.

खूप संकट आले, पावलो पावली,
………………. रावांच्या घरात, अखेर भेटली मला सावली.

खुश ठेवा मला, नको माणिकमोती,
………… राव नेहमी ऱ्हावा, तुम्ही माझ्यासोबती.

अरेंज म्यॅरेजमध्ये कसा जोडीदार मिळेल, याची होती भिती,
परंतु …………………. रावांच्या येण्याने, बदलली माझी स्तिथी.

दूर डोंगरापल्याड, नदीकाठी माझे गाव,
…………….. रावांना आवडले फार, म्ह्णून माझ्या पुढे त्यांचे लागले नाव.

नव्या घरात शोभून दिसतो, डायनिंग टेबल,
……………….. रावांच्या नावासमोर, माझ्या नावाचे लागले लेबल.

जन्मात एक झाली, हि प्रितभेट देवा,
……………. राव मला साथ जन्मी, तुमचीच पत्नी ठेवा.

Also Read This
[300+] अ अक्षरावरून मराठी मुलींची नावे | A Varun Mulinchi Nave

Marathi Ukhane for Female Funny

हळदीने लागला, अंगाला पिवळसर रंग,
…………….. हे आमचे नेहमी, घरकामात दंग.

गरम गरम भाजीबरोबर नरम नरम पाव,
……. आहे बरे, पण खातात नुसता भाव.

पुढे जाते वासरू, मागून चालली गाय,
…….. ला आमच्या आवडते नेहमी दुधावरची साय.

एक बाटली दोन ग्लास,
……. आहे माझे फर्स्ट क्लास.

गोव्यावरून आणले खास फेणी आणि काजू,
…… चा पापा घ्यायला, मी कशाला लाजू.

प्रेमाच्या रानात नाचतो मोर,
…….. शी केले लग्न लग्‍न नशीब माझे थोर.

खोक्यात खोका टीव्हीचा खोका,
मी त्यांची मांजर ते माझा बोका

चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ,
……… रावांच नाव घेते पुढचं नाही पाठ.

पुरणपोळीत तुप असावे साजूक,
………. राव आहेत आमचे फार नाजुक.

भल्या पहाटे करावी देवाची पुजा,
……. च्या जीवावर करते मी मजा.

बागेत बाग राणीचा बाग,
बागेत बाग राणीचा बाग,
आणि
………. रावांचा राग म्हणजे धगधगणारी आग.

कोरा कागद काळी शाई,
……… रावांना देवळात जायची रोजच घाई.

मला नाही वाटत पाल, कॉक्रोच ची भीती,
………. आहेत माझे कबीर सिंग, आणि मी त्यांची प्रिती.

आला आला उन्हाळा, संगे घामाचा ह्या धारा,
………. रावांचे नाव घेते लावून AC चा थंड वारा.

लग्नात मागितला हुंडा एक खोका,
………. रावांचे नाव घेते,
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोका.

………. राव आणि माझा, संसार होईल सुखर,
जेव्हा मी चिरेन भाजी, आणि ते लावतील कुकर.

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
………. रावांना आवडतात, गरम बटाटे वडे.

चांदीच्या ताटात फणसाचे गरे,
……….. राव दिसतात बरे पण वागतील तेव्हा खरे.

कॉलेजमध्ये शायनिंग मारताना, घालायचे गॉगल,
……………… राव आहेत, माझ्यासाठी पागल.

निळ्याभोर आकाशात विमान चालले फास्ट,
…………. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.

Marathi Ukhane for Female Romantic

नीलवर्ण आकाशात चमकतात तारे,
………. रावांचे नाव घेते लक्ष दया सारे.

आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात,
पप्पा आणि मम्मी,
….. राव तुमची साथ हवी, सात जन्मी.

आईवडिलांच्या आशिर्वादाने आला भाग्याचा दिवस,
………. राव पति मिळावे म्हणुन कुलदेवतेला केला नवस.

काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा,
……………… रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.

देह तुळशीचा, वसा चंदनाचा, शब्द करुणेचा,
…………. नाव घेते असावा आर्शिवाद सर्वाचा.

चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार,
……….. रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.

आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा,
………….. राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा.

तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
………………. रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

मोर आहे भारताचा, राष्ट्रीय पक्षी,
………. रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.

प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी,
जीवनाचे पूष्प वाहिले ……… रावांच्या चरणी.

सद्गुणी माझे सासू-सासरे, प्रेमळ माझे माता-पिता,
…………… चं नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता.

चांदीच्या ताटात, कंदीचे पेढे,
…………… च नाव घेते देवापुढे.

हिमालय पर्वतावर आहे, शंकर पार्वतीचा सहवास,
……………. रावांचे नाव घेते, तुमच्या सर्वांसाठी खास.

चुलीवरच्या जेवणाचा, आनंद असतो वेगळा,
………. रावांच्या जीवनात येऊन, आनंद भेटला सगळा.

चांदीची जोडवी, पतीची खूण,
……….. रावांचे नाव घेते,
आजपासून झाली ……….. घराण्याची सून.

मंगळागौरीची पूजा मनोभावे करते,
…………. रावांसाठी दीर्घायुष्य मागते.

आई, बाबा येते आशीर्वाद दयावा,
……….. रावांचा सहवास जन्मभर लाभावा.

मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा,
………. रावांच्या संसारात लावीन दिप नवा.

दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र,
……….. रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.

कस्तुरीचा सुवास दरवळतो रानात,
………. रावांचे नाव घेते माझ्या मनात.

सोपे उखाणे | Easy Ukhane

उगवला रवी, मावळली रजनी,
……… चे नाव सदैव वसे माझ्या मनी.

काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात,
प्रथम दर्शनीच भरली ………… माझ्या मनात.

चंद्र आहे चांदणीच्या संगती,
आणि ……….. आहे माझी जीवनसाथी.

झुळझुळ वाहे वारा, मंद चाले होडी,
आयुष्यभर सोबत राहो ……….. ची जोडी.

दोन शिंपले एक मोती, दोन वाती एक ज्योती,
माझी आणि सौ …………. ची अखंड राहो प्रीती.

अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना,
……….. रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना.

जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध,
………… रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद.

पाच बोटातुन होते कलेची निर्मीती,
…………. ची व माझी जडली प्रिती.

ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल,
…………… चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

भाजीत भाजी पालक,
………… माझी मालकिन अन् मी मालक.

देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,
…………… मुळे झाले संसाराचे नंदन.

रखरखत्या वैशाखात प्रेमाचा घुंद वारा,
जीवनाचा खेळ समजला ………… मुळे सारा.

रोज सकाळी उठुन पितो मी भरपुर पाणी,
……………… चे नाव घेता येते डोळ्यात पाणी.

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी,
……… मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.

श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण,
……..ला सुखात ठेवी हा माझा पण.

वर्षाचे महिने बारा,
………. या नावात सामवलाय आनंद सारा.

हिरवळीवर चरते सुवर्ण हारिणी,
………. झाली आता माझी सहचारिणी.

नवीन घरामध्ये, मन गेलं गांगरून,
……….. रावांच्या मायेची, शाल घेते पांघरून.

पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
……….. रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.

गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
………. रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.

विनोदी उखाणे | Vinodi Ukhane

लग्नात मागितला हुंडा एक खोका,
………. रावांचे नाव घेते,
कुणीतरी ह्यांना दांडक्याने ठोका.

हिरव्या हिरव्या साडीला,
भरजरी काठ,
………. रावांच्या खोड्या सुरु,
जरा वळली की पाठ.

खोक्यात खोका टिवी चा खोका,
………. माझी मांजर आणि मी तिचा बोका.

आकाशात उडतोय पक्षांचा थवा,
………… चे नाव घ्यायला, उखाणा कशाला हवा.

चांदीच्या ताटात फणसाचे गरे,
………….. राव दिसतात बरे
पण
वागतील तेव्हा खरे.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…………… आहेत आमचे फार नाजुक.

नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा,
……….. रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा.

पुढे जाते वासरू, मागून येते गाय,
………..ला आवडते नेहमी दुधावारची साय.

साखरेचे पोते सुई ने उसवले,
………. ने मला पावडर लाऊन फसवले.

नाव घ्या नाव घ्या करु नका गजर,
…….. रावांचं नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर.

हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
……….. रावांचे नाव घेते आमच्या लग्नाच्या दिवशी.

लिपस्टिक वाढवते …….. ची ब्यूटी,
त्याची टेस्ट घेणं,
ही माझी आवडती डयुटी.

उखाण्याचा चाललाय आग्रह,
मारीन म्हणतो बाजी,
…….. च नाव घ्यायला झालो मी राजी.

नाव घ्या नाव घ्या नावाची काय बिशाद,
…….राव तर आहेत माझ्या डाव्या खिशात.

सुंदर सुंदर हिरणाचे ईवले ईवले पाय
आमचे हे अजुन कसे नाही आले,
गटारात पडले की काय?

करतो आम्ही एकमेकांवर खूप प्रेम,
……… ला उचलायचं असेल, तर लागेल क्रेन.

श्रावणात पडतोय रोज पारीजातकांचा सडा,
……….. ना आवडतो गरम गरम बटाटेवडा.

झोप नीट लागावी म्हणून,
मानेखाली घेतली उशी,
………… माझी गरीब गाय,
बाकी सगळ्या म्हशी.

स्टुलावर स्टूल बत्तिस स्तुल,
……… राव एकदम ब्यूटिफुल.

साखरेचे पोते सुई ने उसवले,
……….. ने मला पावडर लाऊन फसवले.

आधुनिक उखाणे | Adhunik Ukhane

लग्नासाठी Propose करायचं, मी केलं Daring,
आता माझ्या जीवनाचं, ………. च्याच हातात Steering.

द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
……….. चे नाव घेते राखते तुमचा मान.

खेळत होतो PUBG, आला ब्लू झोन,
…………….चं नाव घेतो, शोधून सेफ झोन.

सुखद वाटते हिवाऴ्यातले ऊन,
………. रावाचे नाव घेते …….. ची सुन.

लग्नाआधी डेटिंगचे, आम्ही सारे रेकॉर्ड तोडले,
घरच्यांनी बघितले आणि ……… शी लग्न लगेच जोडले.

काचेच्या ग्लासात गुलाबी शरबत,
……….. राव गेले ऑफिसला मला नाही करमत.

एक होति परि,
………… रावांच नाव घेते,
आता जावा आपापल्या घरी.

सॉफ्टवेअर, हार्डवेअरशिवाय कॉम्पुटर होत नाही,
…………. रावांशिवाय कशात मन लागत नाही.

कॉम्पुटर असते फ्लॉपी डिस्क,
……… शी लग्न करून,
मी घेतलीये मोठी रिस्क.

श्रावणात पडतात सरीवर सरी,
………… रावांचं नाव घेताना मी होते बावरी.

वन, टू, थ्री,
……….. रावांचे नाव घेते,
मला करा फ्री.

इंटरनेट वर झाल्या, प्रेमाच्या गाठी भेटी,
……… मुळे मिळाली मला, सुखं कोटी कोटी.

सकाळी पिझ्झा, दुपारी बर्गर,
……….. आहे, माझ्या Life चा Server

…………. रावांची थोरवी मी सांगत नाही,
कितीही प्याले तरीही ते कधीही झिंगत नाहीत.

दिसते इतकी गोड, की नजर तिच्याकडेच वळते,
………… च्या एका स्माईल ने, दिवसभराचे टेन्शन पळते.

बेचव लाईफ झाले टेस्टी, प्रेमाची मजा चाखून,
………… शी तासंतास गप्पा मारतो,
अनलिमिटेड प्लॅन टाकून.

पुरणपोळीत तुप असावे ताजे अन् साजुक,
…………….. आहेत आमचे फार नाजुक.

इतिहासाच्या पुस्तकाला भुगोलाचे कव्हर,
……………… चे नाव घेते ………….. ची लव्हर.

…………..माझी आहे, सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्या येण्यानं झाला, दिवस एकदम स्पेशल.

गर्द आमराई त्यामध्ये पोपटांचे थवे,
…………..चे नाव माझ्या ओठी यावे.

घास भरवितानाचे उखाणे

आजचा दिवस आहे, आमच्यासाठी खास,
………. रावांना भरवते मी, गुलाबजामूनचा घास.

मुंबई ते पुणे, 3 तासांचं आहे अंतर,
आधी खाऊन घेतो जरा, नावाचं बघू नंतर.

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
……………. ला भरवितो लाडूचा घास.

सर्व पाहुणे मंडळी जमल्याने,
दिवस आहे आजचा खास,
…………… ला भरवतो,
मी जिलेबीचा घास.

सुंदर रांगोळ्यांनी आणली, पंगतीला शोभा,
…………… ला भरवतोय घास, सर्वांनी बघा.

पंगतीत दरवळतो उदबत्तीचा सुवास,
…….. रावांना भरवते मी …………. चा घास.

छोट्या टेकडीवर बांधले, मोठे फार्म हाऊस,
घास भरवतो ………….. बोटं नको चावूस.

दवबिंदूत होतो सप्तरंगांचा भास,
………… रावांना भरविते मी …….. चा घास.

संसाराच्या गणिताचे, सुरु झाले पाढे,
………… च नाव घेऊन, भरवते मी पेढे.

उटी, बंगलोर, म्हैसूर, म्हणशील तिथे जाऊ,
………. तुला भरवितो घास पण बोट नको चाऊ.

कधी आमचे लग्न होईल, याचा लागला होता ध्यास,
……………. रावांना भरवते, मी बुंदीचा घास.

शेतकऱ्याला असते, पावसाची आस,
………… रावांना देते, …………. चा घास,

……….. च्या दिवशी फुलांची आरास,
………… रावांना भरवते, ……….चा घास.

सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
………. रावांना भरविते मी ……… चा घास.

प्रेमाला नसते मोजमाप, नसते लांबी रुंदी,
आज भरवते ……….. ला, गोड गोड बासुंदी.

महादेवाच्या मंदिरात नदीचा वास,
……….. रावांना भरविते मी ………. चा घास.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे, स्त्रीचा हात असतो,
…………….. च नाव घेऊन, जेवणाला बसतो.

सर्वांनी आग्रह केला खास,
म्हणून ……….. रावांना भरविते ……….चा घास.

अंगणात पसरला, मोगऱ्याच्या फुलांचा वास,
……………. ला भरवतो मी, लाडूचा घास.

संसारात प्रेमाला हवी, विश्वासाची जोड,
…………. रावांचे नाव घेते, ………. भरवून गोड.

Also Read This
[300+] प अक्षरावरून मुलींची नावे अर्थासहित | P Varun Mulinchi Nave

गृहप्रवेश उखाणे | Gruhapravesh Ukhane

सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात,
…………. रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट.

जमले आहेत सगळे, ………. च्या दारात,
………….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

माहेरचे निरंजन, सासरची वात,
……….. रावांचे नाव घेऊन करते, संसाराला सुरवात.

आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary,
……….. रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry.

आमच्या दोघांच्या जोडीला, आशिर्वाद तुमचा हवा,
………….. रावांसोबत आजपासून, संसार थाटेन नवा.

हिरव्या शालुला जरिचे काठ,
…………. चे नाव घेते, सोडा माझी वाट.

उंबरठ्यावरती माप देते, सुखी संसाराची चाहूल,
……….. च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल.

चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप,
………….. रावां समवेत ओलांडते माप.

त्यांचा छंद आहे क्रिकेट, आणि माझा खो-खो खेळ,
………….. रावांचे नाव घेते, कारण आहे गृहप्रवेशाची वेळ.

जमले आहेत सर्व आज, आमच्या लग्नाकरता दारात,
……………… रावांचे नाव घेते, येऊ द्या आता घरात.

लग्नाचे 7 फेरे आहेत, 7 जन्माच्या गाठी,
…………. रावांचे नाव घेते, खास तुमच्यासाठी.

सोन्याचे कलश, चांदीची परात,
………… रावांचे नाव घेते, नव्या घरात.

माहेरच्या ओढीने, डोळे येतात भरून,
………… रावांच्या संसारात, मन घेते वळून.

आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले,
…………. चं नाव घ्यायला …………. अडवले.

जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज,
………… च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज.

कोकणात जाताना, लागते जंगल घनदाट,
…………… रावांसोबत बांधली, अखेर जीवनगाठ.

लोणावळा ला जाताना, धुके पडले दाट,
…………….. रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट.

मराठी भाषा आहे, महाराष्ट्राची अस्मिता,
……….. राव माझे श्रीराम, आणि मी त्यांची सीता.

उंबरठयावर ठेवलेले माप, पायाच्या स्पर्शाने लवंडते,
…………….. रावांची पत्नी या नात्याने, गृहप्रवेश करते.

आहे मी प्रेमळ, नाही मला कोणाचा द्वेष,
………… रावांचं नाव घेऊन, करते गृहप्रवेश.

हळदी कुंकवासाठी उखाणे | Haldi Kunku Ukhane

नीलमणी आकाशात, चंद्राची प्रभा,
………… रावांच्या नावामुळे, कुंकवाची शोभा.

वडिलांची माया आणि आईची कुशी,
…….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

हळदी कुंकूचे, निमंत्रण आले काल,
………. रावांचे नाव घेऊन, कुंकू लावते लाल.

जास्वदांच्या फुलांचा हार, गणपती बाप्पाच्या गळ्यात,
………….. रावांचे नाव घेते, स्त्रियांच्या मेळ्यात.

भारत देश स्वतंत्र झाला, 15 ऑगस्टच्या दिवशी,
……….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
……….. रावांचे नाव घेते,
आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

सर्व दागिन्यात, श्रेष्ठ काळे मणी,
………. राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी.

हळदी कुंकूला झाली, महिलांची गर्दी,
…………… राव घालतात, पोलिसांची वर्दी.

आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,
……….. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

श्रीकृष्ण रास खेळे, गोपिकेच्या मेळी,
………..रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,
………… रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ.

कान भरण्यात, बायका आहेत हौशी,
………. रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,
……….. रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.

हळदी कुंकूसाठी, जमल्या साऱ्या बायका,
……………. रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र-सूर्य झाले माळी,
…………. रावांचे नाव घेते, हळदी-कुंकूंच्या वेळी.

जळगाव फेमस आहे, पिकवण्यासाठी केळी,
………. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या वेळी.

आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,
…………. रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

कपाळावर कुंकू, आणि गळ्यात मोत्याचा हार,
……….. रावांचे नाव घेताना, आनंद होतो फार.

सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास,
………….. रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

तुमच्या आग्रहाकरिता नाव घेते, आशिर्वाद द्यावा,
…………….. रावांचा सहवास, आयुष्यभर लाभावा.

पुजेसाठीचे उखाणे | Puja Ukhane

गणपती बाप्पाला आवडती, तलावातील कमळे,
…………….. रावांसोबत, माहेर विसरून रमले.

सासरची मंडळी, आहेत खूपच हौशी,
……….. रावांचे नाव घेते, ………च्या दिवशी.

आज आहे, श्रावणी पोळा,
………. रावांच्या जीवावर, शृंगार केले सोळा.

काचेच्या अलमारीत, गणपतीची मूर्ती,
…………. बसली पूजेला, मी करतो आरती.

मोत्यांची माळ, सोन्याचा साज,
………… रावांचे नाव घेते, …… आहे आज.

पूजेला बसणार म्ह्णून, घातला सदरा,
………… रावांनी आणला मला, मोगऱ्याचा गजरा.

आला आला …….. चा, सण हा मोठा,
………. राव असताना, नाही आनंदाला तोटा.

हरतालिकेनंतर येते, गणेश चतुर्थी,
……….. रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.

श्रावणात येतो, पर्जन्य वृष्टीला जोर,
…………… रावांसारखे पती मिळण्यासाठी,
भाग्य लागते थोर.

समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी,
………… रावांचे नाव घेते, …….च्या दिवशी.

देवापुढे ठेवले, प्रसादाचे ताट,
……….. रावांमुळे भेटली, माझ्या आयुष्याला वाट.

देवापुढे लावली, समईची जोडी,
…………. रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.

………. ची पूजा, मनोभावे करते,
………. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

नैवेद्य बनवलेला, देवापुढे ठेवते,
………….. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

……….. पुढे लावली, समईची जोडी,
……….मुळे आली, आयुष्याला गोडी,

झिम्मा खेळून, फुगडी घालून, खूप बाई दमले,
पूजेचे जागरण संपताच,
मन …………. रावांकडे धावू लागले.

………….. च्या समोर, ठेवले केशरी पेढे,
……….. रावांचे नाव घ्यायला,
कसले हो आढे-वेढे?

पुढे ठेवल्या, फुलांच्या राशी,
…………. रावांचे नाव घेते, ……….. च्या दिवशी.

पुढे मांडले, प्रसादाचे ताट,
………… मुळे मिळाली माझ्या, आयुष्याला वाट.

……….. ची पूजा, मनोभावे करते,
………. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

सत्यनारायण पूजेसाठी मराठी उखाणे

आज आहे चाळीत, सत्यनारायणाचा गजर,
…………. रावांचे नाव घेताना, सगळे आहेत हजर.

हिमालय पर्वतावर बर्फाचे खडे,
………… रावांचे नाव घेते सत्यनारायणापुढे.

हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी,
………….. रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

सत्यनारायणाची पूजा मनोभावे करते,
……………. रावांसाठी, दीर्घायुष्य मागते.

बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण,
……….. रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.

हातात घातल्या बांगडया, गळ्यात घातली ठुशी,
……….. रावांचे नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी.

कोल्हापूरचा प्रसिद्ध दागिना कोल्हापुरी साज,
…………… चे नाव घेते सत्यनारायण आहे आज.

पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,
……….. रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.

सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा,
……….. रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

देव्हाऱ्यापुढे समोर ठेवल्या, पंचपक्वान्नाच्या राशी,
………… रावांचे नाव घेते, सत्यनारायणाच्या दिवशी.

आता मी आहे, दोन मुलांची आई,
………. रावांसोबत सत्यनारायण पूजेला बसण्याची, मला खूप घाई.

सत्यनारायण पूजेला बसण्याचा, मिळाला आम्हाला मान,
………… रावांसोबत माझा संसार, असाच राहूदे छान.

पूजेला जमले, सारे घर सोबती,
……….. रावांसोबत करते, सत्यनारायणाची आरती.

सत्यनारायण पूजेला, बसलो दोघे जोडीने,
……………. रावांचे नाव घेते, सदा आवडीने.

हरतालिकेनंतर येते, गणेश चतुर्थी,
………… रावांसाठी आहे मी, नेहमी आतुरती.

महाराष्ट्राची परंपरा म्हणजे, मंगळागौरीचा खेळ,
………………. रावांचे नाव घेते, सत्यनारायणाची वेळ.

पूजेला नटण्यासाठी, बायका असतात खूप हौशी,
………….. रावांचे नाव घेते, सत्यनारायण पूजेच्या दिवशी.

बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण,
……….. रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.

पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,
………… रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.

सूर्य प्रकाशाने येते, पृथ्वीवर ऊर्जा,
……….. रावांसोबत करते, सत्यनारायणाची पूजा.

मकरसंक्रांती उखाणे | Makar Sankranti Ukhane

संक्रातीच्या दिवशी, तिळाचे काढते सत्व,
………… रावांचे नाव घेते, आज हळदी कुंकवाचे महत्व.

पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी, घालतात त्यात गुळ,
………………. रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

मकर संक्रांतीला, लोक उडवतात पतंग,
…………….. रावांची आवड आहे सत्संग.

संक्रांत आहे म्हणून, साऱ्या आल्या नटून,
……………… माझी दिसते, सर्वात उठून.

एका आठवड्यात, दिवस असतात सात,
……….. रावांचे नाव घेते, आज आहे मकरसंक्रांत.

संक्रातीच्या दिवशी, महिला जमल्या हळदी कुंकवाला,
………… रावांचे नाव घेऊन, आली मी तुमच्या स्वागताला.

मकर संक्रांतीला, कपडे घालतात काळे,
………….. रावांना सुचतात, कुठेपण चाळे.

आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा,
……………. रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.

आज मकरसंक्रांत म्हणुन, दाराला लावले तोरण,
…………. रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.

आज मकरसंक्रांत म्ह्णून, जेवण केले आहे गोड,
……………….. रावांची आहे, मला फार ओढ.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
…………रावांचे नाव घेते,
सर्वांनी कान आणि डोळे खोला.

तिळगुळ घ्या, गोड गोड बोला,
……….. राव बोलतात कमी, तोंड खोला.

देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी,
…………. रावांचे नाव घेते, मकरसंक्रातीच्या वेळी.

मकर संक्रांति म्हणून, ठेवला आहे मी उपवास,
………. रावांचे नाव घेते, आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.

महालक्ष्मीच्या देवीला, अलंकाराचा साज,
………… रावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज.

गुळाने येतो, लाडूला गोडवा,
……….. रावांचे नाव घेते,
आज सर्वांना संक्रातीला बोलवा.

मकर संक्रांतीला असतो, हलव्याच्या दागिन्यांना मान,
………… रावांचे नाव घेऊन देते, हळदी कुंकूचे वाण.

रामायण महाभारतात, बघितले असतील सर्वांनी बाण,
……………. रावांचे नाव घेते, घ्या संक्रांतीचा वाण.

आईच्या हाताचे तिळाचे लाडू, खायला येते खूप मज्जा,
…………. रावांचे नाव घ्यायला, मला नाही वाटत लज्जा.

काकवी पासून, बनवतात गुळ,
……….. रावांचे नाव घेऊन, वाटते तिळगुळ.

डोहाळे जेवण उखाणे | Dohale Jevan Ukhane

आजच्या कार्यक्रमात, जमल्या साऱ्या हौशी,
………… रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

मोहरली माझी काया, लागता नवी चाहूल,
…………. रावांचे नाव घेते, जड झाले पाऊल.

कुबेराच्या भांडारात हिरे आणि माणकांच्या राशी,
………… रावांचं नाव घेते डोहाळे जेवणाच्या दिवशी.

मायेच्या माहेरी डोहाळे जेवणाचा घाट,
…………… रावां चे नाव घेते, केला थाटमाट.

………… माझी आहे सर्व कलांमध्ये कुशल,
तुमच्या येण्याने झाला डोहाळे जेवणाचा
दिवस एकदम स्पेशल.

घाट घातला तुम्ही, पुरवायला माझे प्रेमळ डोहाळे,
………….. रावांच्या प्रेम झुल्यावर, घेते मी हिंदोळे.

फुलांचा सुगंध, दरवळलाय अंगणाशी,
…………. रावांचे नाव घेते, डोहाळे जेवणाच्या दिवशी.

……………. आहे प्रेग्नन्ट, देतो मी तिला फुल,
प्रॉमिस करतो तिला, मी डॅडी असेल एकदम कुल.

हिरवी नेसली साडी, भरला हिरवा चुडा,
…………… रावांचं नाव घेऊन, शोधते बर्फी की पेढा.

काही शब्द येतात ओठातून, काही येतात गळ्यातून,
लग्न असो वा डोहाळे जेवण,
………….. च नाव येतं मात्र माझ्या हृदयातून.

डोहाळे कार्यक्रमासाठी आज फुले मिळाली स्वस्त,
…………. रावांचे नाव घ्यायला कारण लाभलेय मस्त.

डोहाळे जेवणाला सजवली, पाना फुलांची नौका,
……………. रावांच नाव घेते, लक्ष देऊन ऐका.

तुम्हा सर्वांचे प्रेम पाहून डोळे माझे पाणावले,
…………. रावांचं नाव गोड, पुरवा माझे डोहाळे.

आजच्या कार्यक्रमासाठी, महिलांनी केला आहे साज,
…………… रावांचे नाव घेते, डोहाळे जेवण आहे आज.

अविवाहित मुलांसाठी व मुलींसाठी उखाणे

चांदीच्या ताटात मुठभर गहू,
लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.

माझ्या हृदयाला कान लावून, आवाज ऐकतो तो,
………….. रावांना आज लग्नासाठी, सर्वांसमोर बोलते हो.

या कोपऱ्यात गहू, त्या कोपऱ्यात गहू,
बायको नाही अन प्रेयसी नाही तर नाव कुणाच घेऊ?

नवीन वर्ष आले, आतातरी करूया लग्न,
…………. राव मला, आपल्या संसारात व्हायचं आहे मग्न.

फोनवर नेहमी असतात बिझी,
………… राव लग्नानंतर, तुमची लाईफ नाही इझी.

तुझे-माझे नाते, नेहमी असेच रहावे,
………….. आपल्या लग्नानंतर, कधी मैत्री तर कधी प्रेम असावे.

माझ्या आयुष्याची पतंग, खुप उंच उडेल,
जेव्हा साथ देणारी बायको ……………. असेल.

बस झाली आता, लपून छपून भेट,
…………. मला बायको बनवून न्ह्या, तुमच्या घरी थेट.

तुझ्या प्रेमाची, लागली आहे चाहूल,
वाट बघते ………… रावांच्या घरात, कधी टाकते पाऊल.

खूप नाती जुळतील, आता आपल्या जीवनात,
जेव्हा माणसे जमतील ………….. आणि ………….. च्या लग्नात.

बस झाले आता, फोनवर दिवस रात्र बोलणे,
………… राव घरी सांगा लवकर, पाहुणे मारतात खूप टोमणे.

मी तुझा जाणू, तू माझी शोना,
………….. घरी सांगना आपलं, आणि लवकर माझी बायको होणा.

इंद्रधनुष्यात असतात, सप्त रंग,
………… रावांच्या येण्याने, झाले मी दंग.

नको यार, नको बसू रुसून,
………….. तूच माझ्या आई बाबांची, होणारी सून.

समारोप

तर मित्रांनो, आम्हाला खात्री आहे कि, आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले हे मराठी उखाणे आपल्याला नक्कीच आवडले असतील. आम्ही याठिकाणी सर्व संवर्गातील मराठी उखाणे आपल्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. जर आपल्याला हे मराठी उखाणे आवडले असतील तर आपल्या मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना अवश्य शेअर करा.

जर अजून काही मराठी उखाणे तुमच्याकडे असतील तर आपण ते येथे कमेंट करा. आम्ही ते येथे नक्की अपडेट करू.

याच प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी www.HindiMarathi.com या ब्लॉगला भेट द्या.

Was this helpful?
YesNo

Leave a Reply